लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : शहरातील उत्सवी कार्यक्रम संपुनही त्या कार्यक्रमांचे फलक वर्दळीच्या फडके रोडवर मागील १५ दिवसांपासून होते. फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होते याची जाणीव असुनही पालिकेकडून कारवाई केली जात नव्हती. यासंदर्भातच्या तक्रारी वाढल्यानंतर पालिकेच्या ह प्रभाग अधिकाऱ्यांनी फडके रोडसह वर्दळीच्या रस्त्यांवरील फलक, कमानी हटविल्या.

फडके रोड डोंबिवलीतील सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. बाजारपेठ या भागात आहे. रेल्वे स्थानक परिसर याच भागात येतो. वर्दळीचा भाग म्हणून राजकीय मंडळी या फडके रोड, बाजीप्रभू चौक, इंदिर चौक, रेल्वे स्थानक स्कायवॉकला फलक लावण्याला प्राधान्य देतात. यामधील बहुतांशी फलकांचे शुल्क पालिकेत फलक लावणाऱ्या मंडळींनी भरलेले नसते, अशी माहिती आहे.

आणखी वाचा-दहिसरमधील गोळीबार हा उबाठा गटामधील गँगवॉर, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आरोप

फडके रोडवरील वाहतूक कमानींचा वाहनांना अडथळा येत होता. खासगी, केडीएमटीच्या बस वळण घेताना अडत होत्या. तरीही फलक लावणारे ते फलक काढत नव्हते. याविषयी तक्रारी वाढल्या होत्या. ‘लोकसत्ता’ने यासंदर्भातचे वृत्त प्रसिध्द करताच, पालिकेच्या ह प्रभागाने फडके रोड परिसराील सर्व कमानी बेकायदा फलक हटविले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phadke road in dombivli is boards free municipal action against illegal boards mrj
Show comments