‘लॅपटॉप, खुर्च्या , टेबलं, कागदी दस्तऐवज’ हे सगळे वर्णन एखाद्या कार्यालयाचे वाटत असेल ना! वाटणेही साहजिकच आहे म्हणा. कारण या सगळ्या कार्यालयात आढळणाऱ्या प्रमुख गोष्टी आहेत. परंतु एखादे कार्यालय त्यातही चार्टर्ड अकाऊंटंटचे कार्यालय १७५ र्वष जुन्या वाडय़ामध्ये चालत असेल तर.. किती मज्जा येईल ना? म्हणजे अगदी त्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते कामानिमित्त वाडय़ात ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा अनुभव काही औरच असेल यात कसलीही शंका नाही. असे हे अनोखे चार्टर्ड अकाऊंटंटचे कार्यालय म्हणजे जुन्या कल्याणातील ‘फडके वाडा’.

१७५ र्वष जुना असलेला अन् सामाजिक कार्याचा वसा घेतलेला जुन्या कल्याणमधील पारनाका परिसरातील वसंतराव फडके यांचा वाडा आजही ताठमानेने उभा आहे. वाडय़ाच्या दिंडी दरवाजातून आत प्रवेश करताच वाडय़ाचे पुढचे अंगण आपल्या नजरेस पडते. अंगणात उभे राहिले असता प्रथमदर्शनी वाडय़ाचे दोन भाग आपल्याला दिसतात. पहिला म्हणजे ओटी आणि दुसरा सोपा. विशेष म्हणजे फडके वाडा हा दुपाखी असून ओटी आणि सोपा या दोन्ही भागातून वाडय़ाच्या पहिल्या मजल्यावर जाण्याची सोय आहे. ओटी आणि सोपा या दोनही ठिकाणी पूर्वी व्यवहार होत असत. फरक इतकाच की, गोपनीय गोष्टी या सोप्याच्या भागात पार पडत असत. आज ओटीच्या जागेत वसंतराव फडके यांचे चार्टर्ड अकाऊंटन्सीचे कामकाज चालते.

salesman customer conversation shirt piece joke
हास्यतरंग : कापडाच्या दुकानात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
husband wife conversation home report joke
हास्यतरंग : आईच्या घरी…
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke
हास्यतरंग : जेवण करून…
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
husband and wife conversation another woman search joke
हास्यतरंग : माझ्यासारखी…

सोप्याच्या बाजूला ‘बाळंतिणीची खोली’ आहे. सोप्यातून पुढे सरकल्यानंतर ‘माजघराचा’ परिसर लागतो. माजघरातून थोडे पुढे आल्यानंतर वाडय़ाच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठीचा जिना आहे. पहिल्यांदा वाडय़ात वावरणाऱ्या व्यक्तीस हा वाडा जणू काही भूलभुलैयाच आहे की काय असे वाटेल. वाडय़ाच्या पहिल्या मजल्यावरील स्वयंपाकघराचे छत पूर्वी काव्‍‌र्ही (बांबूचे) होते. परंतु त्याची दुरुस्ती करणारे कारागीर मिळत नसल्याने ते काढावे लागले, असे वसंतराव फडके सांगतात. वाडय़ाच्या दुसऱ्या मजल्यावर माळ्याचा भाग आहे. परंतु तो वापरात नाही.

वाडय़ात एकूण ७ खोल्या आहेत. काही वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणात वाडय़ाचा पुढचा भाग गेला. कल्याण आणि परिसरात पूर्वी भातशेती होती. त्यामुळेच कल्याणमधील वाडय़ांमध्ये भाताची कोठारे होती. फडके वाडय़ातही ८ भाताची कोठारे होती. काळानुरूप भाताची कोठारे गेली आणि त्यांचे रूपांतर खोल्यांमध्ये झाले. वसंतराव फडके यांचे राहते घर आणि घराला पूर्वी लागून असणारी चाळ हा सर्व परिसर ‘फडके वाडी’ म्हणून ओळखला जाई. या चाळीच्या ठिकाणी आज टोलेजंग इमारत उभी आहे.

१९४६ मध्ये भगवान प्रभाकर ओक यांच्याकडून गणेश कृष्णा फडके (वसंतराव फडके यांचे वडील) यांनी राहता वाडा विकत घेतला. संपूर्ण वाडा, चाळ, भाताची कोठारे आणि वाडय़ाच्या मागील भागात असणारा एक छोटा वाडा असे सर्व ४०,००० रुपये किमतीस खरेदी केले. वाडा संस्कृती म्हटली की, भाडेकरू ही संकल्पना त्यालाच जोडून येते. फडके वाडय़ात आजही दोन भाडेकरू वास्तव्यास आहेत. मात्र हे भाडेकरू मूळ वास्तूत राहात नाहीत. त्यापैकी दिघे कुटुंब वाडय़ाच्या मागच्या अंगणाच्या परिसरात तर पिंपळखरे हे वाडय़ाच्या मागे असणाऱ्या दुसऱ्या वाडय़ात राहतात. दिघे १९४० पासून तर पिंपळखरे त्याआधीपासून भाडेकरू म्हणून नांदत आहेत, असे फडके सांगतात.

फडके वाडय़ात आजमितीला वसंतराव फडके, शैलेश फडके (मुलगा), सुवर्णा फडके (सून), भार्गव फडके (नातू), केतकी फडके (नात) असे फडके कुटुंबीय सुखाने नांदत आहेत. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असणारे वसंतराव फडके आज वयाच्या ८५ वर्षीही आपले चार्टर्ड अकाऊंटन्सीचे कामकाज वाडय़ात समर्थपणे चालवीत आहेत.

थोरामोठय़ांची पायधूळ लागलेली वास्तू

गणेश कृष्णा फडके (वसंतराव फडके यांचे वडील) कल्याणमधील एक आदरणीय नेतृत्व होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते विश्वासू अनुयायी होते. १९३७ च्या विधानसभा निवडणुकीत कल्याणचे आमदार म्हणून ते निवडून आले होते. अशा या घरमालकाच्या सामाजिक कार्यामुळे आणि कर्तृत्वामुळे निरनिराळ्या कारणांनी ज्या महनीय व्यक्तींनी या वास्तूला भेट दिली त्यांची नावे पाहिल्यास आश्चर्यचकीत व्हायला होते. स्वातंत्र्यवीर सावरकर, साहित्यसम्राट न.चिं.केळकर, जमनादास मेहता, विजय र्मचट, माधवराव हेगडे, वामनराव ओक, कृष्णराव धुळप, भिवंडीचे दादासाहेब दांडेकर, भाऊसाहेब धामणकर, नानासाहेब करंदीकर, ताराबाई वर्तक, गोविंदराव वर्तक, भाऊसाहेब वर्तक, खंडू रांगणेकर, विमलाताई रांगणेकर या आणि अशा कित्येक महनीय व्यक्तींच्या भेटी या वास्तूने पाहिल्या आहेत. वेगवेगळ्या गरजू व्यक्तींना आणि कुटुंबांना या घराने आश्रय दिला आहे. तात्याराव सावरकर कल्याणमध्ये व्याख्यानासाठी येत असत. तेव्हा ते कल्याणात फडकेंच्या घरी मुक्कामासाठी खास थांबत असत, असे वसंतराव फडके आवर्जून सांगतात.
समीर पाटणकर

Story img Loader