छायाचित्र काढण्याची आवड असलेल्या व्यक्ती आपल्या कॅमेऱ्यात नेहमीच काहीतरी वेगळे टिपण्याचा प्रयत्न करत असतात. ठाण्यातील ओवळा येथील फूलपाखरू उद्यान येथे अनेक रंगीबेरंगी, वेगवेगळ्या जातीची फुलपाखरे पाहायला मिळतात. या फुलपाखरांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. यावेळी छायाचित्रकारांना फूलपाखरांचे छायाचित्र कसे काढावे याबद्दल नि:शुल्क मार्गदर्शन केले जाणार आहे. संपर्क : ९९८७०९४९१४
कधी – रविवार, १६ ऑगस्ट
कुठे – ओवळेकर वाडी फूलपाखरू उद्यान, ओवळा, ठाणे (प.)
वेळ : सकाळी ८ ते दुपारी १२
आणखी वाचा