पूर्वा साडविलकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगभर दहशत निर्माण करणाऱ्या करोना विषाणूमुळे चीनवरून आयात होणाऱ्या पिचकाऱ्यांवर बंदी आल्याने यंदा बाजारात देशांतर्गत उत्पादन करण्यात आलेल्या पिचकाऱ्यांचाच पर्याय उपलब्ध आहे. चिनी उत्पादकांचे आव्हान नसल्याने भारतीय पिचकाऱ्यांच्या किमती दुपटीने वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा धुळवडीला बच्चेकंपनींसाठी पिचकारी खरेदी करणे खिशाला जड जाणार आहे.

जागतिक बाजारपेठेत चिनमधून निर्यात होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंचा मोठा वाटा असून या देशाची उत्पादन क्षमता अधिक असल्याने जगभरात या देशातून विविध वस्तूंची आयात केली जाते. मात्र, चीनमधून जगभरात पसरत चाललेल्या ‘करोना’ विषाणूचा परिणाम हा जगभरातील आयात निर्यातीवर झालेला पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारपेठेलाही त्याचा मोठय़ा प्रमाणात फटका बसला असून होळीच्या सणासाठी वापरण्यात येणाऱ्या पिचकाऱ्यांची आयात यंदा झालेली नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी होळीच्या सणासाठी चीनमधून मोठय़ा प्रमाणात पिचकाऱ्या विक्रीसाठी येतात. विविध आकारांच्या पिचाकाऱ्यांच्या किमतीही कमी असतात. मात्र, करोना विषाणुमूळे आयात झाली नसल्याने बाजारात पिचकाऱ्यांच्या किंमती वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील बाजारपेठांमध्ये देशी बनावटीच्या पिचकाऱ्या मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. चीनमधील पिचकाऱ्या ५० रुपये ते ३०० रुपयांर्पयच्या किंमतीत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. तर, भारतीय पिचकाऱ्यांची किंमत १०० रुपये ते ८०० रुपयांपर्यंत आहेत. दरम्यान, या पिचकाऱ्यांची किंमत चीनी पिचकाऱ्यांपेक्षा अधिक असल्याने ग्राहकही या पिचकाऱ्या खरेदी करण्याकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे पिचकाऱ्यांच्या मागणीत ५० टक्क्य़ांनी घट झाली असून विकेत्यांचे नुकसान झाले आहे.

चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या पिचकाऱ्यांमध्ये दरवर्षी नवनवीन प्रकार पाहायला मिळतात. भारतीय ग्राहकांना डोळय़ांसमोर ठेवून निर्माण केल्या जाणाऱ्या या पिचकाऱ्या वैविध्यपूर्ण ढंगाच्या बनवलेल्या असतात. मात्र, यंदा चिनी आयातच रोखण्यात आल्याने नावीन्यपूर्ण पिचकाऱ्या अपवादानेच पाहायला मिळत आहेत. पाणी भरलेली बंदूक, छोटी पाण्याची बुदली असलेली पिचकारी, पब्जीगन असे गतवर्षीचेच प्रकार यंदा विक्रीस उपलब्ध आहेत.

चीनमधून यंदाच्या वर्षी पिचकाऱ्यांचा माल भारतात विक्रीसाठी दाखल झालेला नाही. त्यामुळे यंदा भारतीय पिचकाऱ्यांची विक्री बाजारात केली जात आहे. मात्र, भारतीय पिचकाऱ्यांच्या किंमती जास्त असल्यामुळे नागरिक पिचकाऱ्या खरेदी करताना हात आखडता घेत आहेत.

-विशाल चव्हाण, पिचकारी विक्रेते, ठाणे