बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात बारवी धरणाच्या पायथ्याशी असलेले पिंपळोलीवाडी हे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित केले जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. नुकतेच महामंडळ आणि बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टच्या सदस्यांच्या उपस्थितीत गावात त्यासाठीचे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे बदलापूरच्या जांभळांना गतवैभव प्राप्त तर होणार आहे, सोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच पर्यटनवाढीलाही यामुळे फायदा होणार आहे.

बदलापूरचा जांभूळ मुंबई, ठाणे आणि आसपासच्या बाजारपेठांमध्ये प्रसिद्ध होता. मात्र नागरिकरणाच्या ओघात जांभळांच्या झाडांची संख्या कमी झाली आणि पर्यायाने बदलापूरच्या जांभळांची जागा राज्याबाहेरच्या जांभळांनी घेतली. त्याच काळात जांभळाला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टच्या सदस्यांनी पुढाकार घेतला. तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह स्थानिक आमदार किसन कथोरे यांनीही यात सहकार्य केले.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Child Marriage, Supreme Court, Child Marriage Prevention Act,
बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
maharashtra assembly election 2024, Mahayuti Campaign, Palghar, Dahanu,
महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख

हेही वाचा – शहापूरजवळील डोळखांब आरोग्यकेंद्र ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने, श्रेणीवर्धनामुळे ३० खाटांचे रुग्णालय होणार

नुकतेच बदलापूरच्या जांभळाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. याच दरम्यान जांभूळ संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न पाहून खादी ग्रामोद्योग महामंडळाचे प्रमुख रविंद्र साठे यांनीही बदलापूरला भेट देत कामाचा आढावा घेतला. बदलापूर आणि आसपासच्या गावांना मधाचे गाव म्हणून घोषित करण्याबाबत त्यांनी चाचपणी सुरू केली. अखेर काही महिन्यांनंतर अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोलीवाडी हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने गावात तसा फलक लावण्यात आला. बारवी धरणाच्या पायथ्याची हे गाव असून येथे मोठ्या संख्येने जांभळांची झाडे आहेत. या परिसरात प्रामुख्याने जांभूळ मधाचे उत्पादन घेतले जाणार असले तरी अन्य स्वादाच्या मधनिर्मितीलाही प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टचे आदित्य गोळे यांनी दिली.

नक्की काय होणार?

महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे देशातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित झाले. त्यानंतर कोल्हापूरजवळील पाटगांव मधाचे गाव ठरले. त्यानंतर आता अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोली आणि पालघर तालुक्यातील घोलवड या गावांना मधाचे गाव दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे यांनी दिली. या गावाची घोषणा झाल्यानंतर महामंडळाच्या वतीने मधमाशीपालन आणि मधोत्पादनासाठी स्थानिकांना प्रशिक्षण, प्रोत्साहन दिले जाईल. तसेच येथे तयार होणाऱ्या मधाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हेही वाचा – डोंबिवली जीमखाना येथील राम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांची झुंबड, मोबाईलमधून प्रतिमा काढण्यासाठी चढाओढ

बदलापूरचे जांभूळ मुंबई आणि परिसरात प्रसिद्ध आहे. त्यात मधमाशा पालन हा स्थानिक शेतकऱ्यांसाठी पूरक उद्योग ठरेल. त्यामुळे आदिवासींना रोजगार मिळेल. तसेच पर्यटनालाही चालना मिळेल. – किसन कथोरे, आमदार, मुरबाड.