डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चार वरील मध्य बाजुचा कल्याण बाजुकडील जिना बुधवारी दुपारी रेल्वे ठेकेदाराने पत्रे लावून बंद केल्याने गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे. याच फलाटावरील कल्याण बाजुकडील एका जिन्याच्या जवळच खड्डा खोदून त्याच्या भोवती चारही बाजुने पत्रे लावून ठेवले आहेत. तो त्रास सहन करत प्रवासी येजा करत असताना आता दुसऱ्या त्रासाला प्रवाशांना सामोरे जावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>कल्याणमध्ये इमारतीत शिरला बिबट्या, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू

प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता जिना बंद करण्यात आला आहे. जिना का बंद करण्यात आला आहे अशी कोणतीही सूचना जिन्याच्या ठिकाणी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. डोंबिवली स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर स्कायवरुन फलाटावर उतरण्यासाठी प्रवाशांना कल्याण आणि दिवा बाजू अशा दोन्ही बाजुने चढ उतारासाठी जिेने आहेत. या जिन्यामुळे डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात प्रवाशांना सोयीप्रमाणे जातात येते. आता हा जिना बंद केल्याने प्रवाशांना दिवा बाजुकडील जिन्याच्या दिशेने जाऊन मग स्कायवाॅकवर जावे लागते. एका जिन्यावर प्रवासी भार आल्याने जिन्यावर चढ उतार करताना कोंडी होत आहे.

हेही वाचा >>>भिवंडी ते इमारतीत बांधकामाचे उद्वाहक कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

फलाट क्रमांक तीन वरुन छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या धिम्या लोकल आणि चार वरुन कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या जलद लोकल धावतात. दोन्ही फलाट गर्दीचे आहेत. या फलाटावर कल्याण दिशेकडील जिन्याच्या प्रवेशव्दारावर छत उभारणीसाठी गेल्या आठ महिन्यापासून एक खड्डा खणून ठेवला आहे. या कामाचा ठेकेदार काम सोडून निघून गेला आहे. ते काम अर्धवट स्थितीत पडले आहे. फलाटावरील खड्ड्यात प्रवासी पडू नये म्हणून याठिकाणी चारही बाजुने पत्रे लावण्यात आले आहेत. या पत्र्यांचा अडथळा सहन करत प्रवासी लोकलमध्ये चढउतार करतात. या भागातील छत उभारणीचे काम लवकर सुरू करावे अशी प्रवाशांची मागणी आहे.

हेही वाचा >>>VIDEO: “मला बरबाद करण्यासाठी रचलेला तो डाव…”, जितेंद्र आव्हाडांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

बंद करण्यात आलेल्या जिन्याच्या जागेत सरकता जिना उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जिना बंद करण्यात आला आहे. जिना तोडण्याचे काम सुरू झाले की तेथे सूचना फलक लावण्यात येईल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानक ओळखले जाते. या स्थानकातील फलाटावरील कामे रेल्वे प्रशासनाने वेळेत सुरू करुन वेळेत पूर्ण करावीत, अशी प्रवाशांची मागणी आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plight of passengers due to closure of platform stairs at dombivli railway station amy