ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी वाढदिवस होता. या वाढदिवसा निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला आणि मराठीतूनच त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ते पुढे म्हणाले की मी मुख्यमंत्री नसतानाही मोदी, शहा यासह अनेकांनी आठवणीने मला फोन केला. म्हणजेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाही तर एकनाथ शिंदेला आठवणीत ठेऊन शुभेच्छा दिल्या आहेत असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी वाढदिवस होता. या वाढदिवसा निमित्ताने ठाण्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. किसननगर येथे केलेल्या भाषणात शिंदे यांनी मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याचे म्हटले आहे. या भाषणात शिंदे म्हणाले की, ‘आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी फोन केला, काय शिंदेजी कुठे आहात?, मी म्हणालो येथेच आहे… ते म्हणाले काय करत आहात? आज तुमचा वाढदिवस आहे… वाढदिवसाच्या तुम्हाला लाख-लाख शुभेच्छा.. त्यांनी मला मराठीत शुभेच्छा दिल्या. मोदी साहेब, गृहमंत्री अमित शहा साहेब, उपराष्ट्रपती, राज्यपाल सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. आता मी मुख्यमंत्री नाही. तरीसुद्धा त्यांनी मला आठवण ठेऊन शुभेच्छा दिल्या. म्हणजेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाही तर एकनाथ शिंदेला आठवणीत ठेऊन शुभेच्छा दिल्या आहेत.’ असे शिंदे म्हणाले.
मी बाळासाहेबांचा आणि आनंद दिघे साहेबांचा लहान कार्यकर्ता आहे. मी एकदा शब्द दिला की, तो शब्द मागे फिरवित नाही. निवडणूक असू द्या.. नसू द्या.. कोणती आपत्ती किंवा संकट आल्यास हा एकनाथ शिंदे सर्वठिकाणी धावतो असेही ते म्हणाले.