हा न्याहरीचा एक झटपट प्रकार आहे. करायला घेतल्यापासून मोजून अध्र्या तासात होणारा हा प्रकार आहे. या साहित्यात कधी कधी रात्रीची उरलेली भाजीही खपून जाते.
साहित्य –
भिजवलेले जाडे पोहे, उकडून कुस्करलेले बटाटे, आलं, मिरची, धने जिरे पूड, आमचूर
कृती –
सर्व साहित्य एकत्र करून एकजीव करून घ्यावे. या मिश्रणाचे चपटे गोळे करून ते तळावे. रव्यात घोळूनही तव्यावर तळता येतील. किंवा नावीन्य म्हणून बारीक शेवयांच्या चुऱ्यात हे गोळे घोळवून तळता येतात. अत्यंत खमंग लागतात. हे पॅटीस ब्रेडमध्ये घालून त्यावर सॉस, चटणी लावून खाल्ल्यास मस्त सँडविच तयार होते.