डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ एका टेम्पोत पोळी भाजी विक्रीचे सामान ठेऊन हे वाहन रेल्वेस्थानकाजवळील रस्त्यावर उभे करून ठेवण्यात येत असल्याने सकाळच्या वेळेत रेल्वेस्थानक भागात येणाऱ्या वाहनांना या फिरत्या पोळी भाजी केंद्राचा अडथळा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रतिमा लावून हे केंद्र चालविण्यात येत असल्याने पालिका अधिकाऱ्यांना या फिरत्या केंद्रावर कारवाई करताना हात आखडता घ्यावा लागतो.

या फिरत्या पोळी भाजी केंद्राच्या वाहनाच्या दर्शनी भागात खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण ग्रामीण शहरप्रमुख महेश पाटील यांच्याही प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. हे पोळी भाजीचे वाहन मागील काही दिवसांपासून डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानकाजवळील स्कायवाॅकखालील रस्त्यावर आणून उभे केले जाते. या रस्त्यांवरून रिक्षा, दुचाकी, इतर खासगी वाहने धावत असतात. त्यांना या राजकीय मंडळींच्या प्रतिमा लावून उभ्या केलेल्या वाहनाचा अडथळा होत आहे. या वाहनाच्या माध्यमातून ग्राहकांंना पोळी भाजीची विक्री केली जात आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा

हेही वाचा – ‘दावोस’साठी ३४ कोटींची तजवीज

काही नागरिकांनी या वाहनाविषयी पालिकेत तक्रारी केल्या आहेत. या वाहनावरील राजकीय प्रतिमा पाहून या वाहनावर कारवाई कशी करायची, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी डोंबिवली पश्चिमेत दिनदयाळ रस्त्यावर व्दारका हाॅटेलजवळ स्कायवाॅकच्या जिन्याखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रतिमा लावून शिव वडा पावची हातगाडी सुरू करण्यात आली होती. या हातगाडीमुळे या भागात वाहन कोंडीला सुरुवात झाली होती. डोंंबिवली पश्चिम भाग फेरीवाला मुक्त असताना १५० मीटरच्या आत राजकीय दबावातून हातगाडी ठेवण्यात आल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करत होते.

एका लोकप्रतिनिधीच्या स्वीय साहाय्याने या हातगाडीवर कारवाई न करण्यासाठी पालिकेच्या ह प्रभागातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता, अशी चर्चा होती. डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी या स्वीय साहाय्यकाचा सर्वाधिक हस्तक्षेप असल्याने अधिकारी तीव्र नाराज आहेत. नाख्ये उद्योग समूह व्यवस्थापनाने या हातगाडीवर कारवाई झाली नाहीतर न्यायालयात जाण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.

हेही वाचा – मुंबई : नागपाडा पोलीस रुग्णालयात पोलिसाची आत्महत्या

हे प्रकरण थंडावल्यानंतर आता डोंंबिवली पूर्वेत रेल्वेस्थानक भागात राजकीय पोळीभाजी केंद सुरू करण्यात आल्याने या रस्त्यावरून येजा करणारे प्रवासी, पादचारी नाराजी व्यक्त करत आहेत. या वाहनाला रेल्वेस्थानकाजवळील वर्दळीच्या रस्त्यावर उभे राहण्यास मज्जाव करण्याची मागणी नागरिक, व्यापारी करत आहेत. पलिका अधिकारी राजकीय दबावामुळे याविषयावर बोलण्यास तयार नाहीत.

Story img Loader