ठाणे : घोडबंदर येथील वाघबीळ भागात प्रकृती अस्वस्थ असल्याने आत्महत्या करण्यास निघालेल्या वृद्ध दाम्पत्यास पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी वाचविले. त्या वृद्ध दाम्पत्याने त्यांच्या भाच्याला आत्महत्या करत असल्याचा मोबाईल संदेश पाठविला होता. त्यानंतर भाच्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पथकाने त्यांच्या घरी जाऊन दाम्पत्याची सुटका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाघबीळ भागात वृद्ध दाम्पत्य वास्तव्यास आहेत. त्यांची प्रकृती अस्वस्थ असते. बुधवारी रात्री त्यांनी अचानक बंगळूरू येथे राहणाऱ्या त्यांच्या भाच्याला मोबाईलवर एक लघु संदेश पाठविला. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी संदेशात म्हटले होते. भाच्याने तात्काळ याची माहिती कासारवडवली पोलिसांना दिली. त्यानंतर कासारवडवली पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पथक घराबाहेर पोहचल्यानंतर त्यांनी दाराची बेल वाजविली. परंतु आतून कोणीही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे पथकाने घरामध्ये शिरण्याचा निर्णय घेतला. पथक घरामध्ये दाखल झाले असता, शयनगृहात झोपलेले वृद्ध दाम्पत्य उठले. त्यानंतर पथकाने त्यांची सुटका केली. घरामध्ये काहीही संशयास्पद आढळून आले नव्हते अशी माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. त्यांच्या भाच्याला त्यांची विचारपूस  करण्यास सांगितले आहे असे पोलिसांनी म्हटले.