सतत छेड काढतो, लाज वाटेल असे वर्तन करतो म्हणून एका महिलेने दोन मित्रांच्या साथीने 30 वर्षीय तरूणाचे गुप्तांगच कापल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी या महिलेला आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे. डोंबिवलीतील नांदिवली या ठिकाणी ही महिला राहते. एक तरूण तिची छेड काढत होता. त्याला धडा शिकवण्यासाठी तिने रेल्वे रुळाशेजारच्या निर्जन जागी बोलावले. तिथे दोन मित्रांच्या मदतीने त्याचे गुप्तांग कापले. या प्रकारामुळे डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.

या महिलेने तिची छेड काढणाऱ्या 30 वर्षीय तरुणाला रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या निर्जन स्थळी बोलावलं. या ठिकाणी या महिलेचे मित्र आधीच दबा धरून बसले होते. त्यांनी या तरुणाला झाडाला बांधलं आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर या तरुणाचे गुप्तांग कापले आणि त्या ठिकाणाहून हे तिघेही पळून गेले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला एम्स रुग्णालयात दाखल केले. त्या तरुणाची स्थिती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती मानपाडा पोलिसांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी या महिला आणि तिच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे.

Story img Loader