डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील एका किराणा दुकानात चाॅकलेट खरेदीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीबरोबर ३८ वर्षाच्या दुकानदाराने अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी तात्काळ दुकानदाराला अटक केली.उमाराम चौधरी असे दुकानदाराचे नाव आहे. या दुकानदाराचे डोंंबिवलीत पश्चिमेत किराणा दुकान आहे. दुकानाच्या वरील भागात हा दुकानदार निवास करतो.

दोन दिवसापूर्वी एक अल्पवयीन मुलगी दुकानात चाॅकलेट खरेदी करण्यासाठी आली. त्यावेळी दुकानात इतर ग्राहक नव्हते.दुकानदाराने या मुलीशी लगट करून तिला दुकानातून गोडबोलून स्वता राहत असलेल्या दुकानाच्या वरील राहत्या भागात नेले.तेथे बालिकेला काही कळण्याच्या आत तिच्याशी अश्लिल चाळे केले. अचानक घडलेल्या या प्रकाराने बालिका घाबरली. तिने दुकानदाराच्या तावडीतून सुटका करून घेतली. तिने दुकानाबाहेर येऊन ओरडा केला. ही माहिती आजुबाजुचे नागरिक, पादचारी यांना कळताच त्यांनी दुकानदाराला जाब विचारून बालिकेशी केलेल्या घृणास्पद कृत्यावरून त्यांना चोप दिला.

बालिकेने ही माहिती घरी जाऊन आपल्या आई, वडिलांना दिली. पालकांनी तातडीने विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून बालिकेशी अश्लिल चाळे करणारा दुकानदार उमाराम चौधरी यांना अटक केली.

Story img Loader