डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. POCSO कायद्या अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने जी तक्रार केली त्यानंतर ही कारवाई पोलिसांनी केली आहे. कुंदन चौहान असं आरोपीचं नाव आहे. तो मूळचा उत्तरप्रदेशचा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी नेमकं काय सांगतिलं आहे?

कुंदन चौहान हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो डोंबिवली या ठिकाणी त्याच्या भावाकडे आला होता. त्याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने यासंबंधी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी कुंदन चव्हाणला अटक केली आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक आशा निकम यांनी दिली आहे.

डोंबिवली पूर्व भागातील आपल्या नातेवाईकांकडे पाच दिवसांचा पाहुणा म्हणून आलेल्या कुंदन चौहान या तरुणाने त्याच्या शेजारी राहत असलेल्या एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळे केले. रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांकडून तक्रार दाखल होताच पोलिसांनी तरुणाला अटक करण्यात आली.

अटक तरुणाचे नाव कुंदन चौहान (२२) आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवासी आहे. दोन दिवसापूर्वी कुंदन डोंबिवलीतील आपल्या भावाच्या घरी पाच दिवसांचा पाहुणा म्हणून आला होता. त्याच्या घराच्या शेजारी पीडित मुलगी आपल्या आईसह राहते. आरोपी कुंदन अल्पवयीन मुलीची छेड काढू लागला. सोमवारी मुलीची आई शेजाऱ्यांकडे गेली होती. पाठीमागून दोन्ही मुलांना येण्यास सांगितले. बहीण, भाऊ रस्त्याने जात असताना भावाला शिवीगाळ करुन कुंदनने मुलीला आपल्या घरात घेऊन तिच्या बरोबर अश्लील चाळे केले. घडल्या प्रकाराने पीडित मुलगी घाबरली होती. पीडितेच्या आईने कुंदनच्या घराचा बंद दरवाजा उघडला. तेव्हा पीडितेने रडत घडला प्रकार सांगितला. पीडितेच्या कुटुंबीयांनी तात्काळ रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी कुंदन विरुध्द पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested a 22 year old man for molesting a minor girl in dombivli rno scj