उल्हासनगर: कोणत्याही अधिकृत दस्तऐवजांशिवाय भारतात प्रवेश करून उल्हासनगर शहरात घरकाम करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे उल्हास नगरातील कॅम्प तीन भागात अमिना खातून हरुन गाझी उर्फ रेक्सोना उर्फ पूजा (३४) हिला अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यात बेकायदेशीर रित्या देशात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पकडून अटक केली जाते आहे. उल्हासनगर शहर आणि आसपासच्या भागात अशा अनेक बांगलादेशी व्यक्तींवर गेल्या काही दिवसात कारवाई करण्यात आली आहे. उल्हासनगर पोलिसांनी शहर आणि ग्रामीण भागातही बांगलादेशी व्यक्तींना पकडण्यासाठी कारवाई केली होती.
उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात याबाबतच्या विविध घटना आहेत बांगलादेशी नागरिक ग्रामीण भागात चाळींमध्ये वास्तव्यास असल्याचे अशा कारवायांमध्ये दिसून आले होते. स्थानिक पातळीवर मोलमजुरी ची कामे करून हे बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्य करतात. परिमंडळ चर्चा पोलिसांनी अशा बांगलादेशी नागरिकांना पकडण्यासाठी गेल्या काही महिन्यात मोठी शोध मोहीम राबवली आहे. यात त्यांना मोठे यश मिळाले आहे. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी अशीच एक कारवाई करत एका महिलेला अटक केली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागात एका इमारतीत अमिना खातून हरुन गाझी उर्फ रेक्सोना उर्फ पूजा (३४) ही महिला वास्तव्यास होती. ही महिला धुणी भांडी करत होती. ही महिला मुळ पत्ता ग्राम आशासुनी श्रीकलोश, आशासुनी पोलीस थाना, शाखिरा बांग्लादेश येथील आहे. या घुसखोर बांगलादेशी महिला नागरिकाने कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय अवैध मार्गाने भारत-बांगला सीमेवरून छुप्या मार्गाने भारतीय सरहद्दीमध्ये प्रवेश केला. पोलिसांना माहिती मिळतात त्यांनी या महिन्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.