कल्याण : येथील पूर्व भागात रस्त्याने पायी चाललेल्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या तरूणाला कोळसेवाडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. या तरूणाने यापूर्वी असे काही प्रकार केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रकांत दिवेकर असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. पीडित तरूणी १३ वर्षाची आहे. ती एका शाळेत शिक्षण घेते. पीडित तरूणी सोमवारी सकाळी खासगी शिकवणीवरून आपल्या घरी पायी चालली होती. त्यावेळी पाळत ठेऊन असलेल्या आरोपी चंद्रकांत दिवेकर याने तरूणीचा पाठलाग सुरू केला. आपल्यामागे एक तरूण वेगाने येत आहे हे कळल्यावर तरूणीने आपल्या चालण्याचा वेग वाढविला.

हे ही वाचा…आसनगाव लोकलमध्ये सापडलेले २० लाख रूपये, मूळ मालकाला कल्याण रेल्वे पोलिसांकडून परत

दरम्यानच्या काळात आरोपीने धावत जाऊन या तरूणीला रस्त्यात अडविले. तिच्या बरोबर अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केला. या तरूणाच्या तावडीतून सुटका करून घेऊन पीडितेने घर गाठले. तिने घरी घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला. पीडितेच्या पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. आरोपी तरूणाविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून कल्याण पूर्व भागात चंद्रकांत दिवेकर याचा शोध घेऊन त्याला अटक केली.