लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील एका औषध विक्रेत्याला शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी दुकानातून खेचून रामनगर पोलीस ठाण्यात आणले. औषध दुकान जबरदस्तीने बंद पाडण्यास भाग पाडले. या घटनेचा निषेध म्हणून डोंबिवली मेडिकल वेलफेअर असोसिएशनतर्फे सोमवारी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांना निवेदन देण्यात आले. ही कारवाई करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.

mobile theft pimpri loksatta news
रेल्वे स्थानकावर मुक्काम, दिवसभर मोबाईलची चोरी आणि…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
punjab police drugs fact check Video
पंजाब पोलिसांकडून खुलेआमपणे ड्रग्जचे सेवन? पत्रकाराने रंगेहाथ पकडले; Viral Video मागचं नेमकं सत्य काय? वाचा
Manisha Achadaye issued notice to contractor over stalled sports complex work in VTC ground
महापालिका आयुक्तांकडून झाडाझडती क्रीडा संकुलाच्या कंत्राटदाराला नोटीस, बदल्यांच्या निर्णयालाही स्थगिती
Vitthalwadi police raided illegal hookah parlor registering case against driver and customers
उल्हासनगरमधील माणेरे गावातील हुक्का पार्लर चालकावर गुन्हा
Dombivli ayre gaon Thief arrested Theft in four shops
डोंबिवलीत आयरेगावमध्ये चार दुकानांमध्ये चोरी करणारा चोरटा अटकेत
Raids on companies selling medicines without a license Mumbai print news
विनापरवाना औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांवर छापे, अन्न व औषध प्रशासनाने केली औषधे जप्त
Saif Ali Khan attack case Accused caught after making transactions through mobile
सैफ हल्ला प्रकरण : मोबाइलद्वारे व्यवहार केल्याने आरोपीचा शोध

यावेळी राज्य औषध विक्रेता संघटेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, आमदार राजेश मोरे, असोसिएशनचे चेअरमन नीलेश वाणी, अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव संजू भोळे, खजिनदार रेखा गोमतीवाल, राजेश कोरपे, विलास शिरुडे, राहुल पाखले, लिना विचारे उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांना औषध विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाने एक निवेदन दिले.

आणखी वाचा-डोंबिवलीत रिजन्सी, गोळवली, दावडीकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांची मनमानीने भाडेवाढ

या निवेदनात म्हटले आहे, की राहुल मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअरचे मालक राहुल चौधरी रुग्णांचा विचार करून रात्री साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत रुग्णसेवेसाठी अनेक वर्ष दुकान उघडे ठेवतात. अनेक वर्षापासून त्यांची ही रुग्णसेवा सुरू आहे. शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दोन पोलीस राहुल चौधरी यांच्या औषध दुकानात शिरले. त्यांनी त्यांना दुकान बंद करण्यास सांगितले. दुकानात ग्राहक औषधे घेण्यासाठी आलेले असताना ही जबरदस्ती करण्यात आली. दुकानातील कर्मचारी दुकान बंद करत होते. यावेळी दुकान मालकांना दुकानातून खेचून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कोणतेही कारण नसताना त्यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली.

आणखी वाचा-अखिलेश शुक्लासह सात जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

औषध विक्रेत्यावर जाणीवपूर्वक दबाव टाकून दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. याप्रकरणाची सविस्तर चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी करावी आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी. अन्यथा एक दिवस औषध दुकाने बंद ठेवण्याचा इशारा औषध विक्रेता संघटनेने दिला. औषध विक्रेत्यांवर ठोस कारण असल्याशिवाय दुकान बंदची कारवाई करू नये. राहुल चौधरी यांना देण्यात आलेले न्यायालयीन समजपत्र मागे घेण्यात यावे. या घटनेतील दोषीवर कारवाई करावी, अशा मागण्या औषध विक्रेता संघटनेने पोलीस अधिकाऱ्याना केल्या आहेत.

Story img Loader