ठाणे : प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या नूपुर शर्मा यांच्याविरोधात संपूर्ण देशभरात मुस्लिम संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तिच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर भिवंडीतील दोन तरुणांनी भूमिका घेतली होती.
या तरुणांना अटक करण्यात आली असली तरी, शहरातील सामाजिक सलोखा तुटू नये यासाठी पोलिसांनी आता समाजमाध्यमावर करडी नजर ठेवण्यास सुरूवात केली असून व्हॉट्सॲप ग्रुप तयार करणाऱ्या ॲडमिनना समाजमाध्यमांद्वारेच नोटीसा पाठविण्यास सुरूवात केली आहे. धार्मिक भावना दुखावणारे संदेश प्रसारित केल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.