डोंबिवली- येथील मानपाडा पोलीस ठाण्याचे बहुचर्चित वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची सुमारे ६० कोटी बेनामी मालमत्तेची चौकशी करण्याची तक्रार भाजप नेत्यांनी मंगळवारी मुंबईतील वरळीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे दाखल केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>“ठाण्यात पोलीस संरक्षण दिलेले १०० जण कोण? सरकारी पैशाची उधळपट्टी का?” अजित पवारांचा शिंदे सरकारला सवाल

या व्यतिरिक्त आणखी काही मालमत्तेची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्या मालमत्तेची खात्री झाल्यानंतर ती माहितीही आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करणार आहोत, असे भाजप डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांनी सांगितले.शेखर बागडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार सुपुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या खास मर्जीतले ओळखले जातात. डोंबिवलीत गेल्या वर्षापासून मंत्री रवींद्र चव्हाण आणि खा. डाॅ. शिंदे यांच्यात विकास कामे, सार्वजनिक कार्यक्रम विषयांवरुन धुसफूस सुरू आहे. मंत्री चव्हाण यांना डोंबिवलीत लक्ष्य करण्याचा प्रयत्न वर्षभरापासून शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जात आहे. याचा एक भाग म्हणून चव्हाण यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांचे समर्थक डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा बागडे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला.
जिल्हा शिवसेना नेत्याच्या इशाऱ्यावरुन बागडे यांनी ही कृती केल्यावरुन भाजप आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे.बागडे यांना धडा शिकवण्यासाठी भाजपने त्यांची, त्यांचे मंत्रालयातील बंधू मंगेश आणि कुटुंबीयांची सुमारे ६० कोटीची बेनामी मालमत्ता शोधून त्याची चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा याठिकाणी लागू होत असल्याने ईडीकडेही बागडे यांची तक्रार केली जाणार आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>सरस्वती हत्या प्रकरण: मनोज सानेची आज वैद्यकीय आणि मानसिक तपासणी होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निकटवर्तियाने वर्षभरात ठाण्यात राष्ट्रवादीचे आ. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनाही डिवचले आहे. आता या निकटवर्तियाला धडा शिकवण्यासाठी बागडे यांचे निमित्त पुढे करुन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शड्डू ठोकले आहेत. बागडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तियाला खिंडीत गाठण्यासाठी भाजप बरोबर राष्ट्रवादीचे नेतेही आक्रमक झाल्याने येत्या काळात शिंदेंची शिवसेना विरुध्द भाजप, राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. डोंबिवली प्रकरणावरुन मंत्री चव्हाण आक्रमक असल्याने राष्ट्रवादीसह इतर पक्षाच्या नेत्यांनी खासगीत त्यांना समर्थन दिल्याचे कळते. या आक्रमकपणातून भाजपने कल्याण, ठाणे, पालघर लोकसभेसाठी दावा करुन शिंदेच्या शिवसेनेला कैचीत पकडले आहे.

हेही वाचा >>>Mira Road Murder : “डेटिंग ॲपवर सक्रिय होता मनोज साने, सरस्वतीचा मोबाईलही…”, पोलिसांनी दिली माहिती

बागडे यांची मालमत्ता

नाशिक देवळाली बस स्थानकाजवळील देवळाली कॅम्पजवळील २७ लाख ५६ हजाराची वाणिज्य मालमत्ता, नाशिक रविवार पेठ मधील तिरुमल्ला हाईट्समधील एक कोटीची मालमत्ता. रिध्दी सिध्दी कन्स्ट्रक्शनमधील ५१ लाखाचा व्यवहार, नवी मुंबई सानपाडा येथील महाविर अमृत सोसायटीमधील पाच कोटीची सदनिका, नाशिक पांढुर्ली येथील एक कोटीची मालमत्ता, सातोरी सिन्नर फाटा येथील पाच कोटीची मालमत्ता, विविध बँकांमधील ४८ लाखाच्या ठेवी, बागडे यांच्या मुलीच्या विवाहासाठी नाशिक येथे एक कोटी खर्च, ठाणे क्रांति संकुल येथील ३० लाखाची सदनिका, देवळाली विनी कॅम्प येथील १५ लाखाची मालमत्ता, ठाणे पाचपाखाडी गगनगिरी संकुलातील मालमत्ता, इगतपुरी शेणित येथील १० एकर जमीन, ५५ लाखाचे सोन्याचे दागिने, लक्झरी कार.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police officer shekhar bagde of dombivli lodged a complaint with the anti corruption department amy
Show comments