ठाणे – कासारवडवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील खैरे (५५) यांचा ठाणे न्यायालयात कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा असा अंदाज पोलीसांना आहे. त्यांच्या निधनामुळे शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
कासारवडवली पोलीस ठाण्यात सुनील खैरे कार्यरत आहेत. ते ठाणे न्यायालयात पोलीस ठाण्याचे कामकाज पाहतात. बुधवारी सायंकाळी न्यायालयात असताना अचानक ते कोसळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
First published on: 25-01-2024 at 01:30 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police officer sunil khaire dies in court thane amy