ठाणे : ठाण्यात १९ वर्षीय मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरूणी सात महिने गरोदर होती. तिची प्रसूती कळवा पूलाखाली झाल्यानंतर ती ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली होती. याप्रकरणात ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव यांनी गुन्हा दाखल करण्यास कसूरी केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> राज यांच्या ‘चवदार’ भेटीत कार्यकर्त्यांची मने मात्र कडू !

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना

पिडीत तरूणी ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास आहे. तिच्यावर एका तरूणाने लैंगिक अत्याचार केले होते. त्यापासून ती सात महिन्यांची गर्भवती होती. बुधवारी रात्री तिला प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिला कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तिच्याकडून पूर्वीचे वैद्यकीय कागदपत्र आणि जन्मदाखल्याची मागणी करण्यात आली. परंतु कागदपत्र नसल्याने ती रुग्णालयातून बाहेर पडली. गुरुवारी ती कळवा पूलाजवळ आली असता, तिची प्रसूती झाली. यात तिचे बाळ दगावले. त्यानंतर पिडीत मुलगी तिच्या पालकांसोबत अत्याचार प्रकरणाची तक्रार नोंदविण्यासाठी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गेली.

हेही वाचा >>> पवारसाहेब, आयात उमेदवार देऊ नका; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाची विनंती

येथील पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव यांनी तक्रार नोंदविली नाही. याबाबत स्थानिकांनी समाजमाध्यमांवर वृत्त प्रसारित केल्यानंतर परिमंडळ एकचे उपायुक्त सुभाष बुरसे यांनी नितीन जाधव यांच्या निलंबनाचे आदेश काढले. दरम्यान, कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण कापूरबावडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणात डाॅक्टरांचीही हलगर्जी असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डाॅक्टरांना विचारले असता, ती अल्पवयीन असल्याचा संशय आल्यामुळे तिच्याकडे जन्मदाखला तसेच कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी कागदपत्र त्यांनी दिले नाही म्हणून त्यांना याप्रकरणी पोलीसात नोंद करण्याची सूचना केल्याचे स्पष्टीकरण दिले.