ठाणे : येत्या काही दिवसांत दसरा आणि दिवाळी निमित्ताने महिलावर्ग मोठ्याप्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडणार आहे. या कालावधीत महिलांची छेडछाड किंवा गैरप्रकार टाळण्यासाठी साध्या वेशातील महिला पोलिसांची गस्त ठेवली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यात सण उत्सवांना सुरूवात झाली आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दसरा सणानिमित्ताने ठाणे बाजारपेठेत तसेच आयुक्तालय क्षेत्रातील विविध मुख्य बाजारपेठेत महिला खरेदीसाठी बाहेर पडतील. दिवाळी निमित्तानेही माॅल तसेच बाजारपेठेत तरुणी खरेदीसाठी जातात. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील महिला पोलीस, दामिनी पथक, निर्भया पथकांची गस्ती सुरू ठेवण्याची माहिती डुंबरे यांनी दिली. सण उत्सवांच्या कालावधीत कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि हे सण उत्सव आनंदाने साजरे करावेत असे आवाहनही त्यांनी केले.