डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावरील ईगो बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लिल नृत्य रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. अंगावर तलम, तंग कपडे घालून महिला नृत्यसेविकांकडून ग्राहकांना भुलविण्याचे प्रकार केले जात असल्याच्या वाढत्या तक्रारी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींवरून उपायुक्तांच्या आदेशावरून बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने ईगो बारमध्ये रविवारी रात्री छापा मारून बार चालक, व्यवस्थापक आणि ग्राहक, नृत्यसेविकांना ताब्यात घेऊन अशा एकूण ३० जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानपाडा पोलीस ठाण्याच्या अंंतर्गत ईगो बारचा परिसर येतो. पण येथील पोलिसांना कळून न देता बाजारपेठ पोलिसांनी उपायुक्त झेंडे यांच्या आदेशावरून ही कारवाई केली. ईगो बारचे चालक दिनेश शेट्टी, व्यवस्थापक प्रफुल्ल दुहेरी यांच्यासह १४ पुरूष ग्राहक आणि १६ महिला नृत्यसेविका यांच्या विरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार रमाकांत पाटील यांनी तक्रार केली आहे. नृत्यसेविका या चेंबुर, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण परिसरातील आहेत. बहुतांशी ग्राहक नांदिवली, दिवा, चेंबूर, कल्याण, डोंबिवली परिसरातील असल्याचे पोलीस तपासात आढळले. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गोरे, हवालदार खोकले, शिंदे, रमाकांत पाटील हे रविवारी रात्री १२ वाजल्यानंतर शिळफाटा येथील ईगो बारवर कारवाईसाठी आले. गोरे यांनी बारमध्ये मागच्या दाराने प्रवेश केला. त्यांना बारमधील सभागृहात व्यासपीठावर तंग, तलम कपडे घालून काही महिला वाद्यवृंंदाच्या तालावर नृत्य करत असल्याचे दिसले. ग्राहक समोरील सोफ्यांवर मद्यसेवन करत बसल्याचे पोलिसांना दिसले.

पोलिसांना पाहताच बारमधील नृत्यगाणी थंडावली. ग्राहकांना जागीच बसून राहण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारमध्ये अश्लिल नृत्य करून ग्राहकांना नितीभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला. स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी प्रमाणापेक्षा अधिकच्या महिला सेविका म्हणून ठेऊन प्रचलित नियमांंचा भंग केला म्हणून बार चालक, व्यवस्थापक, ग्राहक आणि महिला सेविकांविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिळफाटा, मलंगगड रस्ता, नेवाळी, काटई पाईपलाईन रस्त्यावरील बहुतांशी बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. बारमध्ये बहुतांशी भूमाफियांची सर्वाधिक वर्दळ असल्याचे समजते.