मुंब्रा येथे पोलिसांनी ७२ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी इरफान सय्यद (३९) आणि रज्जाक रंगरेज (३५) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंब्रा येथील प्राईम रुग्णालयासमोर काहीजण एमडी हे अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे, साहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे, पोलीस शिपाई जमदाडे यांच्या पथकाने सापळा रचून इरफान आणि रज्जाक या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडून ७२ ग्रॅम वजनाचे १ लाख २९ हजार ६०० रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ आढळून आले.

याप्रकरणी इरफान आणि रज्जाक विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police seized mephedrone in mumbra amy