महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाईंदर पूर्वेकडील नवघर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल विष्णू वाघ याला अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पीडित महिलेच्या पतीशी वाघ याचे मैत्रीचे संबंध होते. रविवारी वाघ हा पीडित महिलेच्या घरी गेला होता. त्या वेळी त्याने महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला. तसेच मी तुला फोन केला तर माझ्यासोबत येशील का, अशी विचारणा वाघ याने महिलेकडे केली. त्यास महिलेने नकार दिला होता. थोडय़ा वेळाने वाघ याने महिलेच्या मोबाइलवर फोन केला. मात्र घाबरून महिलेने फोन उचलला नाही. तिने पतीला फोन करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर महिलेने नवघर पोलीस पोलीस ठाण्यात जाऊन वाघ याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी वाघ याला अटक केली.