कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विजयी उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवकांमध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेत या राजकीय मंडळींनी शहराचा कोपरा अन कोपरा पालिकेच्या परवानग्या न घेता शुभेच्छा फलकांनी झाकून टाकला आहे. हे फलक काढण्यासाठी जाणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना स्थानिक राजकीय मंडळी दमदाटी करून लावलेले फलक काढू नयेत म्हणून दटावणी करत असल्याचे समजते.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील अमुदान कंपनी स्फोटातून दोन मृतदेहांची ओळख बारा दिवसांनी पटली

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

या शुभेच्छांच्या फलकांमुळे कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसर, कल्याण शिळफाटा रस्ता, शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते श्रीकांत शिंदे यांना देण्यात येणाऱ्या फलकांनी गजबजून गेले आहेत. काही फलकांंवर शुभेच्छुकांचे गळ्यात सोनेरी साखळदंड, हातात कडे घालून लावलेले फोटो पाहून नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. शुभेच्छा देताना संपत्तीचे ओंगळवाणे दर्शन रस्त्यावर कशाला करता, असे प्रश्न नागरिक करत आहेत.

कल्याण डोबिवली पालिका हद्द फलक मुक्त करण्यासाठी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड मागील अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. शहरात एकही बेकायदा फलक दिसता कामा नये, असे आयुक्त डाॅ. जाखड यांचे आदेश आहेत. त्याप्रमाणे पालका साहाय्यक आयुक्त काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच त्याच्या अगोदरच्या दिवसापासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळात श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केले आहे.

हेही वाचा >>> ठाणे : शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के म्हणतात, हा आहे नवा ‘हिंदुस्थान…

हे फलक काढण्यासाठी गेल्यावर स्थानिक राजकीय कार्यकर्ता पालिका अधिकाऱ्यांना चढ्या स्वरात फलक न काढण्याच्या सूचना करत आहेत. यावरून पालिका अधिकारी आणि राजकीय मंडळींमध्ये खटके उडत आहेत. अनेक फलक रिक्षा वाहनतळ पादचाऱ्यांना त्रास होईल अशा पध्दतीन जमिनीपासून काही अंतरावर लावण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ठाण्यातील एका बड्या राजकीय सल्लागाराच्या आशीर्वादाने ९६ फलक शहराच्या विविध भागात झळकत आहेत. या फलकाच्या माध्यमातून मिळणाला मलिदा राजकीय मंडळी परस्पर खात आहेत. यामध्ये पालिकेचे सुमारे २५४ कोटीचे नुकसान होत असल्याचा प्रकार नुकताच याचिकाकर्ते कौस्तुभ गोखलेे यांनी उघडकीला आणला आहे. या प्रकरणाची पालिका अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असताना आता राजकीय फलक अधिकाऱ्यांची मोठी डोकेदुखी झाली आहे.