कल्याण येथील पूर्वेतील चक्कीनाका भागातील निष्पाप अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी येथील संतप्त नागरिकांनी मूक मोर्चा काढला. कल्याण पूर्वेतील नंदादीप नगर येथून पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाजवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा निषेध मूक मोर्चा काढण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या गुन्हेगाराला यापूर्वी नेहमीच राजकीय पाठबळ मिळत गेले. या गुन्हेगारावर सहा गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये त्याला वेळीच शिक्षा झाल्या असत्या तर आता मुलीच्या हत्येचे धाडस त्याने केले नसते. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गुन्ह्याची व्याप्ती विचारात घेऊन या गुन्ह्यातील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होतील यासाठी निर्णय घ्यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक महेश पाटील यांंनी केली आहे.

हेही वाचा >>>सुकामेव्याच्या थरांनी सजलेली नानकटाई, चॉकलेटची रेलचेल

माजी नगरसेवक महेश गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, ठाकरे गटाचे शहरप्रमुख शरद पाटील आणि इतर या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. नागरिकांनी तोंडाला काळी पट्टी लावली होती. शांततेत मोर्चा काढण्यात आला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानक परिसर, कोळसेवाडी भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कल्याण शहरातील वाढत्या गुन्हे प्रकरणाने नागरिक अस्वस्थ झाले आहेत.

राजकीय पाठबळ

अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. या गुन्हेगाराला यापूर्वीपासून राजकीय पाठबळ मिळाले आहे. त्याच्यावर यापूर्वीच्या गुन्ह्यात कठोर कारवाई झाली असती तर त्याने हा गुन्हा केला नसता. परंतु, यापूर्वी या गुन्हेगाराला नेहमीच राजकीय अभय मिळत गेले. या गुन्हेगाराला पाठबळ देणारे राजकीय लोक कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे, असे महेश गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी या गुन्ह्यातील आरोपींना विनाविलंब फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.

अल्पवयीन मुलीच्या हत्येमधून याप्रकरणातील गुन्हेगार किती विकृत, क्रूर आहे हे दिसून येते. मृत मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने याप्रकरणातील गुन्हेगारांवर कठोर कारवाईच्या दृष्टीने निर्णय घ्यावेत.-महेश गायकवाड,माजी नगरसेवक.

ज्या क्रूरतेचा कळस गाठून गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीची हत्या केली. त्याच पध्दतीने आता या प्रकरणातील गु्न्हेगारांचा न्याय झाला पाहिजे. या गु्न्हेगारांना लवकरात लवकर फाशी होईल यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.- शरद पाटील,ठाकरे गट शहरप्रमुख,कल्याण पूर्व.