लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कल्याण: डोंबिवली, कल्याणमधील बहुतांशी रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. ठेकेदारांकडून खड्ड्यांची कामे करुन घेणारे प्रभागातील नियंत्रक अभियंते गायब झाले आहेत. पालिकेत संपर्क करुनही खड्डे भरण्याची कोणतीही शाश्वती मिळत नसल्याने अखेर शहरातील नागरिकांची वाहन कोंडीतून मुक्तता करण्यासाठी डोंबिवली, कल्याण मधील वाहतूक पोलिसांनी स्वखर्चाने खड्डे भरण्याची कामे सुरू केली आहेत.
डोंबिवली शहरातील अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहने हळू चालविली जात असल्याने शहराच्या विविध भागात कोंडी दिसत आहे. प्रत्येक खड्डे असलेल्या रस्त्यावर, चौकात वाहतूक पोलीस तैनात करणे वाहतूक विभागालाही शक्य नाही. खड्डे पडलेल्या रस्त्यांवर खडी, माती, काँक्रीट भरण्याची मागणी वाहतूक विभागाने पालिकेकडे केली आहे.
आणखी वाचा-डोंबिवलीत देवीचापाडा येथे मालवाहतूक रेल्वे मार्गाजवळ बेकायदा इमारत उभारणीचे काम जोमात
या मागणीला अधिकारी, ठेकेदारांकडून अपेक्षित प्रतिसाद नाही. डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी मंगळवारी सकाळी काही कामगार, टेम्पो बघून खड्डे भरणीसाठी राडारोडा मिळविला. वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक आणि स्वता गित्ते यांनी डोंबिवलीतील टिळक चौक, टिळक रस्ता, चार रस्ता, शिवमंदिर, कल्याण रस्ता भागातील खड्डे विटांचे तुकडे टाकून भरुन घेतले.
खड्ड्यांमधून प्रवास करताना वाहन चालकांना करावी लागणार कसरत. प्रवाशांचे होणारे हाल पाहून आम्ही खड्डे भरणीचा निर्णय घेतला आहे, असे वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. डोंबिवली शहराच्या विविध भागातील खड्डे अशाच पध्दतीने भरण्याचा प्रयत्न आहे, असे गित्ते म्हणाले. कल्याणमध्ये वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक गिरीश बने, कोळसेवाडी वाहतूक विभागाचे रवींद्र क्षीरसागर यांनीही कल्याणमधील शिवाजी चौक, सहजानंद चौक, कल्याण पूर्व, शिळफाटा, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे वाहतूक पोलिसांच्या साहाय्याने भरण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाटावर निवारा नसल्याने प्रवाशांची त्रेधातिरपिट
खड्डे भरणीची कामे सुरू आहेत. हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर, नियंत्रक अभियंत्यांवर कारवाई केली जाईल, असे इशारे आयुक्त भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी काही दिवसापूर्वी दिले होते. ते इशारेच निघाले असल्याचे शहरात पडलेल्या खड्ड्यांच्या पसाऱ्यावरुन स्पष्ट झाले आहे. खड्डे भरणीची कामे करण्यासठी ठेकेदार पुढे येत नाहीत. आर्जव करुन काही ठेकेदारांनी खड्डे भरणीची कामे गटाने घेतली आहेत. या ठेकेदारांवर कारवाई केली, त्यांना नाराज केले तर ते आहे ते काम सोडून जातील, अशी भीती पालिका अधिकाऱ्यांना असल्याने ते ठेकेदारांविषयी आक्रमक भूमिका घेत नसल्याचे कळते.
मागील वर्षी डोंबिवलीत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी पाऊस असुनही रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत खड्डे भरणीची कामे करुन शहर खड्डे मुक्त करण्यात महत्वाची कामगिरी केली होती. काही अभियंत्यांना त्यांचा वरचढपणा न रुचल्याने त्यांनी वरिष्ठांचे कान फुंकून लोकरे यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजना विभागात वरिष्ठांना पदस्थापना देण्यास भाग पाडले. पालिकेतील महत्वाचे अधिकारी अडगळीच्या जागी वरिष्ठांकडून फेकले जात असल्याने प्रशासकीय कामाचा बोजवार उडाला आहे
आणखी वाचा-ठाण्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
“डोंबिवलीतील बहुतांशी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होतो. वाहन कोंडीला सुरूवात होते. ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने किमान वर्दळीच्या भागातील खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली आहे.” -उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक विभाग.