लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: पावसाने उघडीप दिल्याने कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे प्रशासनाने जोमाने सुरू केली आहेत. लहान खडी आणि माती खड्ड्यात भरुन त्यावरुन रोड रोलर फिरवला जात असल्याने रस्ते सुस्थितीत होत आहेत. दोन महिन्यानंतर रस्त्यावरुन वाहने आदळ-आपट न करता धाऊ लागल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

if congress in power will cancels adani contract
धारावी प्रकल्प रद्द करणार! काँग्रेसचा ‘मुंबईनामा’ जाहीर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली

महिनाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील डांबरी रस्त्यांची चाळण केली आहे. या रस्त्यांवर अधिक संख्येने खड्डे पडले आहेत. पाऊस सुरू असताना ठेकेदाराने खड्ड्यांमध्ये खडी आणि माती टाकून खड्डे भरण्याचा प्रयत्न केला. या रस्त्यांवरुन वाहनांची येजा असल्याने खडी खड्ड्यात आणि माती रस्त्यावर पसरल्याने बहुतांशी रस्त्यावर चिखल झाला आहे. पाऊस सुरू झाला की अनेक रस्ते हे आदिवासी, दुर्गम भागातील रस्त्यांसारखे मातीचे वाटतात.

आणखी वाचा-लोकल ट्रेनमध्ये शिरायला जागा मिळत नसल्याने महिला थेट मोटरमनच्या केबिनमध्ये

कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्ता, चिंचपाडा रस्ता, गोविंदवाडी रस्ता, शहाड उड्डाण पूल, मोहने, अटाळी रस्ता, बल्याणी, टिटवाळा रस्ता, गोविंदवाडी रस्ता, दुर्गाडी किल्ला रस्ता, डोंबिवलीत ठाकुर्ली रस्ता, गणेशनगर, मानपाडा रस्ता, आयरे रस्ता, एमआयडीसी डांबरी रस्त्यांवर सर्वाधिक खड्डे पडले आहेत.

या रस्त्यांवरुन येजा करताना आपण नक्की स्मार्ट सिटीच्या यादीत असलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेतील रस्त्यावरुन खरच येजा करतो का असा प्रश्न प्रवासी, वाहन चालकांना पडतो. बाहेरच्या शहरातील पाहुणा शहरात वाहनातून आला तर तोही शहरातील रस्ते पाहून हैराण होत आहे.

आणखी वाचा-ठाण्यात रस्ते सफाईसाठी गुजरातचे यंत्र वाहन; समाज माध्यमांतून पालिकेवर टीका

दोन दिवसापूर्वी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी पालिका हद्दीतील रस्त्यांची पाहणी केली. पावसाने उघडीप दिल्याने रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, अशा पध्दतीने काम करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना दिले आहेत. त्यामुळे ठेकेदारांनी दिवसा, रात्री कामे करुन रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे जोमाने सुरू केली आहेत.

गणपतीपूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत करण्याचे आदेश आयुक्त दांगडे यांनी ठेकेदारांना दिले आहेत. आता प्रत्येक रस्त्यावर खड्ड्यांमध्ये खडी भरण्याची कामे सुरू आहेत. खडी भरल्यानंतर त्यावर रोड रोलर फिरवून खडी दबून टाकली जाते. ही बारीक खडी काही दिवसांनी रस्त्यावर पसरण्याची भीती वाहन चालकांना आहे.