ठाणे :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने ठाणे जिल्ह्यातील महामार्गावर खड्डे भरणीची कामे केली असली तरी पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा उखडू लागल्याचे चित्र आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलावरील रस्ता तसेच कशेळी-काल्हेर भागातील रस्त्यांवर हे चित्र आहे. यामुळे खड्डे भरणीच्या कामावरच प्रश्नचिन्ह उभे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक आणि जुना आग्रा मार्गावरील कशेळी -काल्हेर मार्गावर पावसामुळे खड्डे पडले होते. हे मार्ग ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचे मानले जातात.   खड्डयांमुळे मुंबई-नाशिक आणि कशेळी -काल्हेर मार्गावर वाहतूक कोंडी होत असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. खड्डय़ांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका व्हावी यासाठी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि एमएसआरडीसी या प्राधिकरणांना स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र, बुजवलेले खड्डे पुन्हा उखडल्याने त्यांच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  या संदर्भात एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि उपअभियंता डोंगरे यांच्याशी  संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिक्रियेसाठी प्रतिसाद दिला नाही.