लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डोंबिवली: डोंबिवली पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यू आयरे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरुन सतत जड, अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. पालिकेने डागडुजी करुनही या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. न्यू आयरे रस्त्यावरुन आयरे गाव, तुकारामनगर, कोपर पूर्व रेल्वे स्थानक परिसरात नागरिंकाची पायी, रिक्षेतून, खासगी वाहनाने येजा सुरू असते. अनेक प्रवासी डोंबिवली रेल्वे स्थानकात जाण्यापेक्षा कोपर रेल्वे स्थानकात जाऊन प्रवास करतात. त्यामुळे न्यू आयरे रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे.

या रस्त्यावरुन रात्रीच्या वेळेत आयरे भागात उभारण्यात येणाऱ्या बेकायदा चाळींना विटा, वाळू, ग्रीट, सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रक धावत असतात. या अवजड वाहनांमुळे न्यू आयरे रस्त्याची सर्वाधिक वाताहत झाली आहे, असे स्थानिक रहिवासी सांगतात. अवजड वाहनांनी रस्त्यावरील आहेत ते खड्डे मोठे होतात. त्याचा फटका रिक्षा, मोटारी, दुचाकी स्वारांना बसतो. पोलिसांनी रात्रीच्या वेळेत बांधकामाची चोरटी वाहतूक करणाऱ्या चालकांना रोखले तर हे खड्ड्यांचे प्रमाण कमी होऊ शकेल. या वाहनांना रोखणारी यंत्रणा नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

आणखी वाचा-ठाणे: बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

कोपर पूर्व रेल्वे स्थानकात भागात बेकायदा बांधकामे करणारे भूमाफिया न्यू आयरे रस्त्याचा इच्छित स्थळी जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. आयरे गाव परिसरातील रहिवासी, आयरे बेकायदा विस्तारित भागातील वस्तीमधील रहिवासी याच रस्त्यावरुन येजा करतात. शाळकरी मुलांची या रस्त्यावरुन वर्दळ असते. या भागातील दवाखाने, दुकानांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना खड्ड्यांचा फटका बसत आहे.

स्थानिक नगरसेवक विशू पेडणेकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना या रस्त्यावरील खड्डे भरण्याची सातत्याने मागणी करत आहेत. मुसळधार पावसाचे कारण सांगून ठेकेदार खड्डे भरणीस तयार नसल्याचे सांगण्यात येते. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रवासी हैराण आहेत. तरीही पालिका प्रशासन जबाबदार ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.