कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शहरी भागांसह २७ गाव ग्रामीण भागातील रस्त्यांवर गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावली आहे. त्यामुळे शहराच्या काही भागांत वाहन कोंडी होत आहे.

जून अखेरपर्यंत पालिकेकडून पावसाळापूर्वीची खड्डे भरणीची कामे सुरू होती. ही कामे सुरू असताना मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. नव्याने खड्डे भरणी केलेल्या रस्त्यांवरील खडी सततच्या वाहनांमुळे रस्त्यावर पसरली आहे. या खडीमुळे दुचाकी घसरण्याचा धोका वाढला आहे. हे खड्डे पावसाने उघडीप दिल्यानंतर पालिकेच्या ठेकेदाराने भरले नाहीत तर खड्ड्यांचे आकार वाढून पादचारी, वाहन चालकांना त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. शहाड पुलावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांच्या भागातून वाहन चालक संथगतीने वाहने नेतात. त्यामुळे शहाड पुलावर वाहन कोंडी दिसते. पाऊस सुरू असल्याने हे खड्डे पाण्याने भरतात. अनेक वेळा या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी स्वार या खड्ड्यांमध्ये पडतात, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…

हेही वाचा – डोंबिवलीतील पती-पत्नीकडून गुंतवणूकदारांची अडीच कोटींची फसवणूक

वाहतूक पोलिसांनी विटा, खडी टाकून हे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता. सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे खडी दोन तासांत बाहेर येते, असे पोलिसांनी सांगितले. डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर, राजूनगर, देवीचापाडा रस्ता, आयरे रस्ता, मानपाडा रस्ता, एमआयडीसीमधील जुने रस्ते, कल्याण चिंचपाडा, खेडगोळवली, काटेमानिवली, २७ गावांमधील पिसवली, आडिवली ढोकळी, मलंग रस्ता, सोनारपाडा, वसार भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शहाड उड्डाण पूल, पत्रीपूल, दुर्गाडी पूल, गांधारे पूल, ठाकुर्ली पूल, कोपर पूल याठिकाणी खड्डे पडणार नाहीत. पडले तरी हद्दीचा आणि नियंत्रक संस्थेचा वाद निर्माण न करता पालिकेने आपल्या हद्दीतील प्रवासी, वाहन चालकांना त्रास नको म्हणून ते खड्डे तात्काळ बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

हेही वाचा – सत्तेतील ‘दादा’प्रवेशाने ठाण्यात भाजप खुशीत

गेल्या वर्षी तत्कालीन शहर अभियंता सपना कोळी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील रस्त्यांची चाळण झाली होती. हे खड्डे बुजविताना पालिकेकडून अक्षम्य दिरंगाई झाल्याने नागरिकांनी पालिकेला दोन महिने खड्डे विषयावरून लक्ष्य केले होते. या टिकेपासून वाचण्यासाठी पालिकेने खड्डे भरणीवर भर देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

“खड्डे भरणीची कामे सुरूच आहेत. पावसाने उघडीप दिली त्याप्रमाणे खड्डे भरणीची कामे केली जात आहेत. खड्डा दिसला की तो तात्काळ भरण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत.” – अर्जुन अहिरे, शहर अभियंता.