लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिकांना संधी मिळाली आहे. तरीही बदलापूर शहरात नगरपालिका मुख्यालयाबाहेरच खड्ड्यांची आरास पाहायला मिळते आहे. पालिका मुख्यालयापासून जवळच शहरातील एकमेव उड्डाणपूल असून त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असले तरी तिथे खड्डे भरणीमुळे उंचवटे तयार झाले आहेत. यामुळे अपघातांची भिती व्यक्त होत आहे.

Mumbai municipal administration, water accumulate,
मुंबई : रेल्वे रुळांवर पाणी का साचले ? पालिका प्रशासनाचे विचार मंथन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Narendra Modi pune, Ganesh Kala Krida Rangmanch,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्याची शक्यता, गणेश कला क्रीडा रंगमंच येथे तयारी सुरू
Prime Minister Narendra Modi in Pune, Traffic changes
पुणे : पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल
park created through afforestation in Marol will open for citizens soon
साडेतीन एकरांत शहरी जंगल! मरोळमध्ये वनीकरणातून साकारलेले उद्यान नागरिकांसाठी लवकरच खुले
nmmc demolished on unauthorized huts in nerul division
नेरुळ विभागात अनधिकृत झोपड्यांवर पालिकेची कारवाई
truck in hole Pune, City Post Office pune,
VIDEO : पुण्यात रस्त्याला भगदाड, अख्खा ट्रक गेला खड्ड्यात, सिटी पोस्ट ऑफिसच्या परिसरातील घटना
Navi Mumbai is Semiconductor Hub start on the occasion of inauguration of Semiconductor Project
नवी मुंबई सेमीकंडक्टरचे हब, सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुहूर्तमेढ

बदलापूर शहरातील बहुतांश रस्ते काँक्रीटचे झाल्याने खड्ड्यांची समस्या काही अंशी घटली आहे. मात्र ज्या ठिकाणी डांबरी रस्ते आहेत, त्या ठिकाणी आजही खड्डे आहेत. ज्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. तेथेही खड्डे पाहायला मिळतात. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागते. कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्यालय सुद्धा या खड्ड्यांपासून वाचलेले नाही. पालिका मुख्यालयाजवळ शहरातील एकमेव उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. येथील पेव्हर ब्लॉक निखळले आहेत. परिणामी येथे वाहनाचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

आणखी वाचा-ठाण्यात रुंद रस्ते पार्किंगसाठी आंदण? रुंदीकरणानंतरही कोंडी कायम

उड्डाणपुलावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने डांबर आणि खडी टाकली. त्यामुळे खड्डे बुजविण्यात आले असले तरी तिथे खड्डे भरणीमुळे उंचवटे तयार झाले आहेत. या उंचवटा भागामुळे येथून वाहने कमी वेगाने जातात. त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. सकाळच्या वेळी अनेक शाळेच्या बस आणि वाहने येथून जात असतात. त्यांनाही या उंचवट्यांचा फटका बसतो. त्यामुळे वाहनचालकांत नाराजीचे वातावरण आहे.

धूळ वाढली

पाऊस थांबल्यानंतर खड्डे बुजवण्यात आले. त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यामुळे उड्डाणपूल आणि इतर भागात धुळीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचा वाहनचालकांना त्रास होत असून लहान विद्यार्थी आणि ज्येष्ठांना त्याचा फटका बसतो आहे.