ठाणे शहरात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा आता सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भांडुपवरून वागळे इस्टेटमध्ये येणारी सालशेत वाहिनी ५० वर्षांहून अधिक जुनी असल्याने त्यावर अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात. या वीज वाहिनीतील बिघाडामुळे ठाणे शहराला होणारा पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. हे टाळण्यासाठी महावितरणच्या वतीने पुढील १५ दिवसांत या वाहिनीच्या दुरूस्तीचा कृती आराखडा राबवला जाणार आहे. जंपर उडणे, वाहिनी तुटणे असे बिघाड टाळण्यासाठी नवे जंपर बसवण्यात येणार असून त्यामुळे या वाहिनीवरील ७५ टक्के अडचणी दूर होतील, असा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या दुरुस्तीमुळे ठाण्यातील औद्योगिक पट्टय़ात विजेचा पुरवठा सुरळीत होऊ शकेल, असा दावा महावितरणचे भांडुप शहर परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश कर्पे यांनी केला.
गेल्या दोन वर्षांपासून सतत खंडीत होणाऱ्या वीज पुरवठय़ामुळे वागळे इस्टेट तसेच ठाण्यातील सुमारे ५२ औद्योगिक वसाहतींमधील लघू उद्योजकांनी महावितरणच्या या कारभारापुढे हात टेकले आहेत. या प्रकारामुळे अनेक उद्योजकांना आठवडय़ाच्या एक दिवस तरी उत्पादन बंद ठेवावे लागत आहे. विजेच्या अनियमित पुरवठय़ामुळे उद्योजक कमालीचे संतापले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून उद्योजकांनी यातून मार्ग निघावा यासाठी प्रयत्न केले, तरीही विजेचा पुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे उद्योजक नाराज होते. दरम्यान, ठाणे बेलापूर उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच यासंबंधी महावितरणच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी वागळे इस्टेट पट्टय़ातील सुमारे ५० हून अधिक उद्योजक सहभागी झाले होते.
वीजसंकटातून ठाणेकरांची मुक्तता?
ठाणे शहरात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा आता सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-07-2015 at 01:29 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power crisis in thane city may soon find a solution