डोंबिवली : महावितरणच्या 100 किलोवॅट उच्च वीज दाबवाहिनीमध्ये देखभाल आणि दुरुस्तीचे काम करायचे असल्याने डोंबिवली पश्चिम येथील काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी नऊ तास बंद ठेवण्यात आला होता. या बंदचा सर्वाधिक फटका घरातून कार्यालयीन काम करणारे, रुग्णालय, सायबर चालक यांना बसला. डोंबिवली पश्चिम येथील महाराष्ट्र नगर, गरीबाचा वाडा, सरोवर नगर, नवापाडा परिसराचा वीज पुरवठा सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरण कार्यालयाकडून ग्राहकांना एक ते दोन दिवस अगोदर मोबाईल लघु संदेश किंवा वर्तमानपत्रातील जाहीर आवाहनातून न देण्यात आल्याने विज ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही ग्राहकांना मात्र गुरुवारी रात्री बारा वाजता महावितरण कार्यालयाकडून आपल्या भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळपासून बंद राहणार असल्याचे लघु संदेश पाठवण्यात आले होते. असे संदेश सरसकट सर्वच ग्राहकांना न मिळाल्याने ग्राहकांकडून नाराजीचा सूर काढण्यात येत होता.

हेही वाचा >>> “मी राज्य विधीमंडळाचा सदस्य, मला…” इतर मतदारसंघात निधी देण्यावरून आमदार कथोरेंची स्पष्टोक्ती

वीज भारनिमन मागील काही वर्षापासून बंद करण्यात आल्याने नागरिकांनी घरातील इन्वर्टर बंद केले आहेत. अचानक वीज पुरवठा खंडित झाला तर नागरिकांची मोठी गैरसोय होते. घरातील लहान बाळे, वृद्ध, दम्याचे रुग्ण यांना घरातील पंखे, वातानुकूलित यंत्रणा बंद झाली तर सर्वाधिक त्रास होतो. त्यांना या वीजपुरवठा बंदचा सर्वाधिक त्रास झाला. अनेक ग्राहकांनी सकाळपासून महावितरण कार्यालय संपर्क करून वीज पुरवठा कधी सुरू होणार, आम्हाला पूर्व सूचना देणारे लघु संदेश का पाठवले नाहीत, अशी विचारणा केली.