महावितरण कंपनीतर्फे वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी कल्याण पश्चिम विभागातील काही भागाचा वीजपुरवठा गुरुवार आणि शुक्रवारी (५ व ६ मे) रोजी काही तास बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्याने दिली.
२२ केव्ही कल्याण पश्चिमेतील स्पोर्टस कॉम्प्लेक्स उपकेंद्रातून निघणाऱ्या अन्नपुर्णा फिडरवरील रमाबाई आंबेडकर नगर, आधारवाडी चौक, संभाजीनगर, पवारणीचा पाडा, गायकरपाडा, रॉयल रेसिडेन्सी, इंद्रप्रस्थ, मेघ मल्हार, नम्रता हाइट्स, गजानंद महाराज चौक, गणेश-गौरी, स्काय व्हिला, मंगेशीधाम, गोल्डनपार्क, न्यु मनीषा नगर, बेतुरकर पाडा, स्वानंदनगर, भोईर कॉलनी, धोबीघाट, काळा तलाव, मच्छिमार सोसायटी, ठाणकरपाडा, हिना पार्क, शंकेश्वर दर्शन, पंचमुखी राम मंदिर, बालगोपाल रेसिडेन्सी, जुना मनीषा नगर भागात गुरुवारी (५ मे) सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच, १००/२२ केव्ही मोहने उपकेंद्रातून निघणाऱ्या मोहने-१२ फिडरवरील मोहनेगाव, गाळेगाव, जेतवन नगर, फुलेनगर, यादवनगर, सहकारनगर, बाजारपेठ, आरएस टेकडी, एनआरसी कॉलनी, धम्मदीपनगर भागात शुक्रवारी (६ मे) सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.