डोंबिवली पश्चिमेतील काही भागाचा वीज पुरवठा मंगळवारी (ता.२०) सकाळी १० ते दुपारी चार वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणने सोमवारी रात्री १२ वाजता लघुसंदेशाव्दारे ग्राहकांना मोबाईलवर कळविली आहे. डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचावाडा येथील २२ केव्ही क्षमतेचे रोहित्र, येथील उच्चदाब वीज वाहिन्या देखभाल, दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

तसेच, नवरात्र आणि दिवाळीपूर्वीची काही महत्वाची कामे कामे पूर्ण करण्यासाठी हा बंद घेण्यात आला आहे, असे महावितरणने म्हटले आहे. ह प्रभाग क्षेत्र परिसर दोन पाण्याची टाकी, गरीबाचापाडा, श्रीधर म्हात्रे चौक, सरोवरनगर, महाराष्ट्रनगर या भागाचा वीज पुरवठा सात तास बंद राहणार आहे. या कालावधीत वीज पुरवठा बंद राहणार असल्याने ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Story img Loader