संवेदनशील कवितांची रिमझिम पखरण, चटकदार किस्से, अंतर्मुख करणाऱ्या हकिकती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अशी स्थानके घेत ब्रह्मांड कट्टय़ावर प्रख्यात सुसंवादक प्रसाद कुलकर्णी यांची आनंदयात्रा ही एक्स्प्रेस सुसाट धावली.  ब्रह्मांड कट्टा सांस्कृतिक मंडळातर्फे हा कार्यक्रम सादर झाला.
आधुनिक युगात माणसांची बेटं बनली आहेत. संपर्क क्रांति झाली असली तरी माणूस माणसांपासून  दूर जाऊ लागला आहे. गर्दीतही तो एकटा आहे. अशा अवस्थेत सकारात्मक दृष्टिकोनच उपकारक ठरू शकतो, असे प्रसाद कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. स्वार्थामागे धावलात तर मृगजळच हाती लागेल, दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केलात तर खऱ्या अर्थाने सुखी व्हाल, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ब्रह्मांड सोसायटीतील गायक सावनकुमार सुपे आणि हेमंत वायाळ यांनी कराओकेच्या माध्यमातून गाणी सादर केली. राजेश जाधव यांनी आभार मानले.

Story img Loader