आशीष धनगर, ठाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे शहरात सहा शाखा असणारे ‘प्रशांत कार्नर’ हे प्रसिद्ध मिठाईचे दुकान. टाळेबंदीचा निर्णय अचानक जाहीर झाल्याने या सहाही दुकानांमधील काही लाख रुपयांची तयार मिठाई आणि मिठाईसाठी लागणारा कच्चा माल खराब झाल्याचे प्रशांत कार्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी सांगितले. या दुकानांत तसेच मिठाई बनवण्याच्या कामासाठी ३५०हून अधिक कामगार आहेत. टाळेबंदीमुळे या कामगारांचे काम बंद झाले होते. मात्र शासनाने आवाहन केल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत या सर्व कामगारांना पूर्ण वेतन देण्यात आल्याचे सपकाळ यांनी सांगितले. यापैकी शंभरहून अधिक कामगारांना त्यांच्या मूळ गावी बसची व्यवस्था करून पाठवले असल्याचेही त्यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे कामगार आपल्याकडे काम करत असल्याने ते टाळेबंदीनंतर परत येतील, अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली. करोनामुळे नागरिक जागरूक झाले असल्याने सध्या बहुतांश ग्राहक हे ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे येत्या काळात ऑनलाइन व्यवसायावर अधिक भर देणार असल्याचे सपकाळ म्हणाले. टाळेबंदीच्या या काळातील कर्जावरील किमान व्याज सरकारने माफ केल्यास व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, अशी मागणीही त्यांनी केली.