ठाणे : राजकीय विरोधकांकडून ५० खोके घेतल्याचे आरोप होत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला ९०० खोके दिले आहेत. पण, ते मतदार संघातील विकासकामांसाठी दिले असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा आभारी असल्याची प्रतिक्रीया बाळासाहेबांची शिवसेनेेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. यापुर्वी आम्हाला निधी मागावा लागायचा पण, आता समोरूनच निधी मिळत असल्याचा दावा करत सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सक्षम असून त्यांनी ठाणे महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी १८०० कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. त्यापैकी ९०० कोटीचा निधी हा ओवळा-माजिवाडा मतदार संघातील विकास कामांसाठी आहे तर, उर्वरित ९०० कोटींचा निधी मतदार संघ वगळून महापालिका क्षेत्रातील उर्वरित भागांसाठी आहे. या निधीमुळे रस्ते, सुशोभिकरण तसेच इतर नागरी कामे होणार आहेत, असेही सरनाईक यांनी म्हटले आहे. होता. यापुर्वी आम्हाला निधी मागावा लागायचा पण, आता समोरूनच निधी मिळतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सक्षम आहे. त्यामुळे आमदारांनी पत्रे देण्यापुर्वीच मुख्यमंत्री शिंदे हे विकासकामांसाठी निधी देत आहेत, असे सांगत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
हेही वाचा: डोंबिवली: मोठागाव ते काटई-हेदुटणे बाह्य वळण रस्त्याचे भूसंपादन रखडले?
गुवाहाटीला असताना आम्ही कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. मनातल्या इच्छा, आकांशा पुर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येऊ असे साकडे देवीला घातले होते. इच्छा, आकांशा पुर्ण झाल्याने आम्ही देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. २६ तारीख निश्चित झाली आहे. २७ तारखेला अनेक लग्न असल्यामुळे २६ तारखेलाच जाण्यासाठी सर्व आमदार आग्रही आहेत. मंत्रीमंडळ विस्तार होईल आणि त्यात कुणाला मंत्री आणि पालकमंत्री पद मिळेल, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा: ठाणे: नितीन कंपनी पूलाजवळ टेम्पोला अपघात; वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल
मंत्री आणि पालकमंत्री पदी कुणाची वर्णी लागणार हे महत्वाचे नसून विकासकामे होत आहेत, हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. तसेच मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. उलट हे सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करून पुढील १० वर्षे सत्तेवर राहील असा दावाही त्यांनी केला आहे. ईडी कारवाईची प्रक्रीया मुख्यमंत्री किंवा कोणताही नेता थांबवू शकत नाही. माझ्यावर दोन वर्षांपुर्वी ईडीची कारवाई झाली होती. ईडीचा जो निर्णय जो आहे, तो न्यायालयातून आलेला असून ही प्रक्रिया जुनी आहे. तसेच हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.