ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण झाल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. आव्हाड यांनी शुक्रवारी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने तो मंजूर केला.माझ्यावर गंभीर गुन्ह्याची कलमे लावण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय अशी कारवाई करण्याची कोणत्याही पोलीस आयुक्तांची हिंमत नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली. महेश आहेर यांच्याकडे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र आहे. त्यानंतरही त्यांना बढती कशी मिळाली असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
ठाणे महापालिकेचे साहायक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण झाल्याप्रकरणी आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार जणांना अटक केली आहे. तर आव्हाड यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला.
जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन
ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण झाल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 18-02-2023 at 03:22 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pre arrest bail to jitendra avhad amy