ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण झाल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. आव्हाड यांनी शुक्रवारी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने तो मंजूर केला.माझ्यावर गंभीर गुन्ह्याची कलमे लावण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय अशी कारवाई करण्याची कोणत्याही पोलीस आयुक्तांची हिंमत नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली. महेश आहेर यांच्याकडे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र आहे. त्यानंतरही त्यांना बढती कशी मिळाली असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
ठाणे महापालिकेचे साहायक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण झाल्याप्रकरणी आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार जणांना अटक केली आहे. तर आव्हाड यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपींना कोठडी
साहायक आयुक्त महेश आहेर मारहाणप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिजीत पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर, हेमंत वाणी आणि विशंत गायकवाड यांना शुक्रवारी ठाणे न्यायालयाने सोमवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली.