ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी भाजपापाठोपाठ आता शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार आणि शरद पवार गटाने तयारी सुरू केली आहे. तिन्ही पक्षांनी मतदार नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट या दोन्ही मित्र पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे आमदार आहेत. या मतदारसंघाची निवडणूक येत्या काही महिन्यांत होणार आहे. या निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून भाजपाने बैठकांचे सत्र सुरू केले आहे. ठाणे लोकसभेसाठी भाजपा आग्रही असल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शिंदे गटाने एक बैठक घेतली होती. भाजपा जर ठाणे लोकसभेवर दावा करत असेल तर आपण कोकण पदवीधर मतदारसंघावर दावा का करू शकत नाही, असा सूर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत लावला होता. त्यावर ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले होते. यामुळे शिंदे गट आणि भाजपामधील अंतर्गत धुसफूस यानिमित्ताने समोर आला होता. असे असतानाच, आता ही निवडणूक लढण्याची तयारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटाने सुरू केली आहे.

हेही वाचा – ठाणे : वाहनांना टोलमुक्ती द्या, लघु उद्योजकांची मागणी

हेही वाचा – कल्याणमध्ये रस्ते काम करणाऱ्या ठेकेदाराला बेदम मारहाण

अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर मागील निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत मुल्ला यांना १४ हजार मते मिळाली होती. त्यातच त्यांनी मतदार नोंदणी सुरू केल्याने ते यंदाची निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर शरद पवार गटदेखील मैदानात उतरला आहे. त्यांच्याकडूनदेखील मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.