महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच, गुरूवारी दिवसभर शहरातील खासगी करोना चाचणी केंद्र दर आकारणीच्या वादामुळे बंद होती. त्यामुळे महापालिकेच्या करोना चाचणी केंद्रावर नागरिकांच्या तपासणीसाठी रांगा वाढल्याचे चित्र होते. या संदर्भात महापालिका प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी खासगी करोना चाचणी केंद्राच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन करोना चाचणीचे दर यापुढे तीन हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास सर्वच प्रतिनिधींनी मान्यता दिल्याने नागरिकांचे आता दिड हजार रुपये वाचणार असल्याचा दावा प्रशासनाने केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in