कल्याण- गणपती विसर्जनाच्या दिवशी कल्याण शहरात कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील ३१ पोहच रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध केला आहे. या भागात कोणत्याही प्रकारची वाहने उभी करू नयेत. याशिवाय दीड दिवस, पाच दिवस आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातून जड, अवजड वाहनांना सकाळी आठ वाजल्या पासून प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी अधिसूचना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी सोमवारी काढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भारत पाकिस्तान सामन्यावर सट्टा ; उल्हासनगर शहरातून एकाला अटक

कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी खाडी किनारी गणेश घाटावर गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. या काळात दुर्गाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गणेश भक्त येतात. याठिकाणी वाहन कोंडी होऊ नये म्हणून आधारवाडी वाहतूक बेट ते दुर्गामात चौक, सहजानंद चौक ते दुर्गामाता चौक, दुर्गामाता चौक ते उर्दू शाळा हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

भिवंडी कोनकडून कल्याणकडे येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने वाडेघर, आधारवाडी चौकातून इच्छित स्थळी जातील. कल्याण पूर्व कोळसेवाडी कडून कोनगावच्या दिशेने जाणारी सर्व वाहने गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याने इच्छित स्थळी जातील. कोनगाव कडून डोंबिवली, शिळफाटाकडे जाणारी हलकी वाहने दुर्गाडी पुलाच्या विरुध्द दिशेच्या मार्गिकेतून गोविंदवाडी वळण रस्त्याने जातील. दुर्गामाता चौक ते लाल चौकी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.कोनगाव, दुर्गाडी पूल येथे वाहतूक कोंडी झाल्यास कल्याण शहरातील वाहने गांधारी पूल, येवई नाक्याकडून इच्छित स्थळी आणि कल्याणात येणारी वाहने याच रस्त्याने शहरात येतील.

हेही वाचा >>> ठाण्यातील खड्डे बुजवले नाहीतर गणेशोत्सवनंतर रस्त्यावर उतरू; मनसेचा पालिका नगर अभियंत्यांना इशारा

वाहने उभी करण्यास मज्जाव रस्ते
मुरबाड रस्ता, पौर्णिमा सिनेमा, सिंदीगेट, संतोषी माता रस्ता, कर्णिक रस्ता, रामबाग गल्ली, परळीकर वखार, जुने पोस्ट ऑफीस, डॉ. म्हस्कर रुग्णालय, महमद अली चौक, अहिल्याबाई चौक, जोशी बाग, चंद्रविलास हाॅटेल, गांधी चौक, टिळक चौक, दीपक हॉटेल, गगनसेठ पेडी, बारदान गल्ली, मर्कन्टाईल बँक, दुधनाका, विजय लाॅन्ड्री, पारनाका, लक्ष्मी नारायण मंदिर ते दत्तात्रय मंदिर, भारताचार्य वैदय चौक ते टिळक चौक. अभिनव विद्या मंदिर, सहजानंद चौक, काळी मस्जिद, भाजप कार्यालय रस्ता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prohibit parking of vehicles on 31 pohach roads on ganpati immersion procession route in kalyan amy