ठाणे : महसूल विभागातील तलाठी (गट क) भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील दोन केंद्रांवर तीन सत्रांमध्ये ही परिक्षा होणार आहे. त्यामुळे या परिक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात ठाणे पोलिसांनी मनाई आदेश लागू केले आहेत. त्यासंदर्भाचे आदेश ठाणे पोलिस दलातील विशेष शाखेचे उपायुक्त डाॅ. श्रीकांत परोपकारी यांनी काढले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नवभारत साक्षरता कार्यक्रमाद्वारे राज्यातील निरक्षरांचा घेतला जाणार शोध

राज्यभरात तलाठी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ही परिक्षा होणार आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील दोन केंद्रांवर तीन सत्रांमध्ये परिक्षा होणार आहे. उमेदवारांना नक्कल करण्यास मदत होणे, परिक्षेस व्यत्यय आणण्याची किंवा गैरप्रकार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षा सुरु असताना परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रिया संबंधित अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त केंद्राच्या १०० मीटर परिसरात जमावास मज्जाव करण्यास तसेच छायांकित प्रती, फॅक्स केंद्र, दूरध्वनी केंद्र ही दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच मोबाईल वापर करण्यास मनाई आदेश करण्यात आली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. हे आदेश १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत अंमलात राहतील.