डोंबिवली- येथील पूर्व भागातील गांधीनगर भागातील सह दुय्यम निबंधक चार आणि कल्याण मधील सह दुय्यम निबंधक दोन कार्यालयात काही दलालांच्या माध्यमातून बेकायदा इमारतींमधील सदनिकांचे दस्त नोंदणीकरण सुरू करण्यात आले आहे. अशाच बेकायदा दस्त नोंदणीकरण प्रकरणात कल्याणमधील सह दुय्यम निबंधक जी. बी. सातदिवे निलंबित झाले. हे माहिती असुनही पुन्हा नियमबाह्य दस्त नोंदणी सुरू झाल्याने वरिष्ठांनी या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी घर खरेदी-विक्री करणाऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत घातक रसायनामुळे कामगार गंभीर जखमी

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Siddhi Kadam Withdraw Mohol
Siddhi Kadam : मोहोळमधून रमेश कदम आणि सिद्धी कदम यांची माघार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राजू खरेंना दिलासा
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?
Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
india reaction on us sanctioned indian firm
अमेरिकेकडून देशातील १९ कंपन्यांवर निर्बंध; भारत सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या कंपन्या…”
New record of UPI transactions
UPI Transactions: यूपीआय व्यवहारांचा नवीन विक्रम; ऑक्टोबरमध्ये २३.५ लाख कोटी मूल्याचे १६.५८ अब्ज व्यवहार

सह दुय्यम निबंधकांच्या हा बेकायदा दस्त नोंदणीचा प्रकार निदर्शनास येणार नाही. यासाठी दस्त नोंदणी कार्यालयात सह दुय्यम निबंधकांच्या समोर मालमत्ता खरेदीदार, विक्री करणारे यांची गर्दी झाली की दलाल हळुच नियमबाह्य दस्त नोंदणीच्या नस्ती सह दुय्यम निबंधकांसमोर ठेवतात. त्यांच्या निदर्शनास येणार नाही अशा पध्दतीने त्यांना नोंदणीची कागदपत्रे दाखवितात. या कागदपत्रांमध्ये प्रथम घर विक्रीमधील एक जुनी पुनर्विक्रीची पावती (इंडेक्स) जोडलेली असते. या पावतीवर विश्वास ठेऊन नस्तीमधील कागदपत्रांची कसुन तपासणी न करता सह दुय्यम निबंधक दलाल आणि कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेऊन त्या कागदपत्रांवर शिक्के आणि स्वाक्षरीची प्रक्रिया करतात, अशी माहिती सह दुय्यम निबंधक डोंबिवलीतील गांधीनगर मधील चार आणि कल्याण मधील होली क्राॅस रुग्णालया जवळील दोन कार्यालयांमध्ये कार्यरत विश्वसनीय सुत्राने दिली. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे.

या सगळ्या व्यवहारात दलाल दस्त नोंदणी करणाऱ्या नागरिकाकडून सुमारे एक ते दीड लाख रुपये उकळतात. हा प्रकार दस्त नोंदणी कार्यालयातील नियंत्रक अधिकाऱ्याच्या नजरेस येणार नाही याची काळजी दलाल घेतात, असे सुत्राने सांगितले.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीतील विना परवाना बाजार भरविणाऱ्या मालकांना नोटिसा, खासगी बाजार चालकांमध्ये खळबळ

एखाद्या बेकायदा इमारतीमधील सदनिका दोन वर्षापूर्वी एका भूमाफियाने एका घर खरेदीदाराला विकली आहे. अशा विक्री व्यवहारातील प्रथम घर विक्री व्यवहाराची (इंडेक्स) पावती दलाल बाहेर काढतात. त्याची नक्कल प्रत तयार करतात. या नक्कल प्रतीवर ज्याला नव्याने घर खरेदी करायचे त्याचे नाव टाकतात. बनावट सर्वे क्रमांक, बनावट सदनिका क्रमांक टाकला जातो. अशाप्रकारे कागदपत्र तयार करुन ती सह दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी ठेवली जातात. सह दुय्यम निबंधकांनी एकदा या कागदपत्रांवर शिक्के आणि स्वारक्षरी केली की ते कागदपत्र बाहेर आल्यानंतर दलाल आपल्या सोयीप्रमाणे त्या कागदपत्रांमध्ये सोयीची कागदपत्रे घुसवितात. त्या कागदपत्रांचा वापर पुन्हा अन्य ठिकाणी करतात. दस्त नोंदणीमुळे खरेदीदार बेकायदा इमारत अधिकृत आहे असे समजून त्या इमारतीत घर खरेदी करतो. घर खरेदीदारांची फसवणूक करण्याचा प्रकार डोंबिवली, कल्याणमध्ये सुरू आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्राने दिली.

बेकायदा बांधकामांची दस्त नोंदणी सुरू झाल्यापासून तीन महिन्यांपासून कल्याणमधील सह दुय्यम निबंधक दोन आणि डोंबिवलीतील चार कार्यालयाबाहेर पुन्हा भूमाफियांची गर्दी वाढू लागली आहे. सातदिवे यांच्यावर एप्रिलमध्ये कारवाई झाल्यापासून कल्याण मधील कार्यालयाबाहेर शुकशुकाट होता. याप्रकरणी डोंबिवलीचे सह दुय्यम निबंधक कणसे यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. ‘एसआयटी’ने या कार्यालयांकडे नजरा वळविल्या आहेत.