कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील अपंगांच्या मालमत्तांना मालमत्ता करात सूट देण्याचा प्रस्ताव गुरुवारच्या महासभेत मंजूर करण्यात आला. अनेक अपंग व्यक्ती स्थानिक पातळीवर, घरबसल्या व्यवसाय करतात. त्यातून त्यांचा उदररनिर्वाह चालतो. अनेक कुटुंबांना मिळकतीमधून मालमत्ता कर भरणे शक्य नसते. त्यामुळे त्यांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीत अनेक अपंग व्यक्ती दूरध्वनी केंद्रासारखे लहान व्यवसाय करतात. अनेक कुटुंबांमध्ये घरातील कुटुंबप्रमुख अपंग व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांच्यावर मालमत्ता कराचा भार टाकण्यात येऊ नये म्हणून हा प्रस्ताव महत्त्वाचा आहे, असे नगरसेवक राजेश मोरे यांनी सांगितले. महापालिका हद्दीत अपंग मुलांना शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. यामध्ये क्षितिज, दिशा, रोटरी स्कूलचा समावेश आहे. या शाळांतील मुले अभ्यासात हुशार असतात. अपंगत्वावर मात करून ती पुढे जातात. अशा मुलांना मैदानी खेळ, पोहण्याच्या संधी नियमित उपलब्ध झाल्या पाहिजेत. तसे झाल्यास क्रीडा क्षेत्रातही ही मुले पुढे जाऊ शकतात. त्यामुळे डोंबिवलीतील पालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील तरणतलाव अपंग मुलांना पोहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केली होती. ती मागणी सभागृहाने मान्य केली.