छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन केले जात आहे. ठाण्यातही टेंभीनाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाजवळ उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात गोवर प्रतिबंधात्मक लशींचा मुबलक साठा; जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची माहिती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानाबाबतचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहे. ठाण्यातही टेंभीनाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकासमोर ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते. त्यांनी कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले.