ठाणे : महापालिका सहायक आयुक्त महेश आहेर यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी पालिका मुख्यल्यासमोर ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करत पक्ष कार्यलय ते ठाणे महापालिका भवन इथपर्यंत मोर्चा काढला. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड या सुद्धा सहभागी झाल्या होत्या.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केल्याच्या संभाषणाची एक ध्वनिफीत चार फिवसंपूर्वी प्रसारित झाली असून या ध्वनिफितमधील संभाषण सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचे असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. ही ध्वनिफीत प्रसारित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आहेर यांच्यावर हल्ला केला होता. धमकी प्रकरणी आमदार आव्हाड यांनी आक्रमक भुमिका घेत आहेर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. तसेच सर्व पुरावे देऊनही करवाई होत नसल्याबाबाबत त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा >>> ठाणे: साहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरण; अटकेतील चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी
काँग्रेसनेही धमकीप्रकरणाची चौकशी करून आहेर यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यापाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिका मुख्यल्यासमोर आंदोलन केले. महेश आहेर यांच्यावर गुन्हा दखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. ऋता आव्हाड या सुद्धा आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. महेश आहेर यांना नक्की कोणाचा आशीर्वाद आहे? इतके पुरावे असूनही त्यांना कोण वाचवत आहे, अद्याप त्यांच्यावर गुन्हा का नोंदवण्यात आला नाही, असा प्रश्न ऋता आव्हाड यांनी उपस्थित केला. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोणाचाही दबावाला बळी न पडता कायद्याचे पालन करून तात्काळ महेश आहेर यांना निलंबन करावे, अशी मागणी त्यांनी केली.