ठाणे – शेती पूरक व्यवसाय म्हणून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी १५ वर्षांपूर्वी इमू पालनाचा व्यवसाय सुरु केला होता. यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कर्ज काढले होते. मात्र या व्यवसायापासून शेतकरी पूर्ण अनभिज्ञ असल्याने त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. यामुळे बहुतांश शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. या व्यवसायासाठी देण्यात आलेले कर्ज माफ व्हावे अशी मागणी करत शेतकऱ्यांनी मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कर्जवसुलीसाठी तगादा लावत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. तर सर्व कर्ज वसुली प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसारच सुरु असल्याची भूमिका जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.

हेही वाचा – वर्सोवा-विरार सागरी सेतू : मच्छिमारांचे मने वळविण्यासाठी एमएमआरडीएचे मत्स्य व्यवसाय विभागाला साकडे

शेतकऱ्यांना शेती पुरक व्यवसाय म्हणून इमू पालन योजना शासनाने जाहीर केली होती. इमू प्राण्याच्या केसापासून ते नखापर्यंत सर्वच माध्यमातून उत्पन्न मिळेल असा दावा शासनाने केल्याने राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँका आणि खासगी पतपेढ्यांनीही शेतकऱ्यांना कर्ज देऊ केले. कर्ज मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या व्यवसायात उडी घेऊन लाखो रुपये गुंतवले होते. इमू पालन योजनेसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जवळपास ५१ शेतकऱ्यांनी ५ कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांकडून घेतले होते. यामध्ये सार्वधिक शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून घेतले होते. मात्र हा व्यवसाय सुरु होताच त्यातून आर्थिक फायदा होत नव्हता. तसेच इमू पक्षांना जिवंत ठेवण्यासाठी खाद्य पुरवणे आवश्यक असल्यामुळे मोठा आर्थिक भार शेतकऱ्यांवर आला.

आधीच शेती व्यवसाय हा गेली अनेक वर्षे बदलत्या हवामानामुळे तोट्यात असताना, यामध्ये इमू व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची भर पडली. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या प्राण्यांना जंगलात सोडून देत आपली सुटका केली. परिणामी हा व्यवसाय तोट्यात गेल्याने अनेक इमू शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत. शासनाने हे कर्जमाफ करावे अशी मागणी हे शेतकरी गेली अनेक वर्षे करत आहेत. तर पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र शासन यांनी महाप्रबंधक राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांना आर्थिक अडचणीत सापडलेल्या इमू कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी २०१८ साली रोजी शिफारस पत्राने कळविण्यात आले होते. असे असतानाही ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कर्जवसुलीसाठी तगादा लावत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत कर्ज माफ करण्याची मागणी केली. मागणी मान्य झाली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा – ठाणे : पालिकेच्या दणक्यानंतर होर्डिंगधारकांनी भरली थकीत रक्कम, ६३ लाखांची थकबाकी वसूली

दरम्यानच्या काळात कर्ज वसुली रोखण्याचे शासनाकडून आदेश आले होते. त्यानुसार कर्ज वसुली थांबवण्यात आली होती. मात्र आता कर्जवसुलीसाठी शासनाने परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बँक काम करत आहे. शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही. – अरुण गोंधळी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

इमु पालनाचा उद्योग सुरू करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांसह अनेक धनाढ्य अर्जदारांनी कर्ज घेतले. यातील काही जणांनी देखावा आणि चैनीचा प्राणी म्हणून इमू वापरला. स्वतःचा खाजगी बंगला, शेतघरे येथे त्यांना ठेवले. अशा काही धनाढ्य कर्जदारांचाही ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदारांमध्ये समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.